घरमुंबईहाफिजला अटक हे पाकिस्तानचे नाटक - शिवसेना

हाफिजला अटक हे पाकिस्तानचे नाटक – शिवसेना

Subscribe

हाफिजला अटक म्हणजे हे पाकिस्तानचे नाटक आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे.

पाकिस्तानने बुधवारी लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदला अटक केली आहे. परंतु, ही अटक म्हणजे पाकिस्तानचे नाटक असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. शिवसेनेने ‘सामना’ मुखपत्रातून आपली भूमिका मांडली आहे. पाकिस्तानने याअगोदर दोनवेळा असा प्रयोग केल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. याशिवाय हा हिंदूस्थानी कूटनीतीचा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकड्यांविरोधात निर्माण केलेल्या दबावाचा विजय असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

काय म्हटले आहे शिवसेनेने?

मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेत अमेरिका, इंग्लंडसह सर्व बडय़ा देशांनीही त्याला समर्थन दिले होते. मात्र नेहमीप्रमाणे चिनी माकडांचेच मांजर आडवे गेले होते. अखेर चीननेही विरोध सोडून दिल्याने संयुक्त राष्ट्रसंघाने हाफिजला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून जाहीर केले. परंतु, हे पाकिस्तानचे नाटकच असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. याअगोदरही पाकिसतानने दोन वेळा असे नाटक केल्याचे शिवसेनेने अग्रलेखात म्हटले आहे. याशिवाय अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, ‘कोणत्याही पाकडय़ा पंतप्रधानाने हाफिजवर कडक कारवाई करण्याचे धाडस आजपर्यंत केलेले नाही. तेव्हा विद्यमान पंतप्रधान इम्रान ते दाखवून आधीच गोत्यात असलेला आपला पाय आणखी खोलात घालतील याची शक्यता नाही. यापूर्वीही हाफिजला स्थानबद्ध केल्याचे नाटक पाकड्यांनी केले होतेच, पण दोन्ही वेळेस त्याची मुक्तता करण्यात आली. किंबहुना, या स्थानबद्धतेच्या काळात त्याची ज्या पद्धतीने बडदास्त ठेवण्यात आली त्यावरूनही पाकिस्तानचे नाटक स्पष्ट झाले होते. त्यामुळे आता त्याला पुन्हा अटक झाली म्हणजे तो त्याच्या दहशतवादी संघटना आणि कारवाया संपल्या असे होणार नाही.’ याशिवाय पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान लवकरच अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे हा बनाव घडवून आणला गेला का? असा सवाल शिवसेनेने केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘विमा कंपन्यांवर मोर्चा काढून शिवसेना शेतकऱ्यांची दिशाभूल करतंय’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -