घरमुंबईबेकायदेशीरपणे मुंबईत राहणाऱ्या पाकिस्तानी जोडप्याला अटक

बेकायदेशीरपणे मुंबईत राहणाऱ्या पाकिस्तानी जोडप्याला अटक

Subscribe

बेकायदेशीरित्या मुंबईत राहणाऱ्या पाकिस्तानी जोडप्याला ओशिवरा पोलिसांनी अटक केली. अहमद दौदानी आणि अश्रफ अहमद दौदानी अशी या दोघांची नावे आहेत

अंधेरी येथून एका पाकिस्तानी जोडप्याला ओशिवरा पोलिसांनी अटक केली. अहमद दौदानी आणि अश्रफ अहमद दौदानी अशी या दोघांची नावे आहेत. गेल्या वीस वर्षांपासून ते दोघेही मुंबई शहरात वास्तव्यास असल्याचे तपासात उघडकीस आले असून त्यांनी बोगस दस्तावेजच्या मदतीने आधारकार्ड, पॅनकार्ड तसेच पासपोर्ट बनवले आहे. त्यांच्याविरुद्ध फसवणुकीसह परकीय नागरिक कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून शुक्रवारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले.

मूळचा भारतीय असून पाकिस्तानचे नागरिकत्व 

अहमद हा मूळचा भारतीय नागरिक असून १९८६ साली तो पाकिस्तानात गेला होता. तिथेच त्याचे अश्रफ या तरुणीसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्यानंतर या दोघांनी विवाह केला होता. काही वर्ष तिथे राहिल्यानंतर त्याने पाकिस्तानी नागरिकत्व मिळवले होते. मात्र १९९९ साली तो पत्नी आणि दोन मुलींसोबत भारतात आला होता. मिरारोड येथे राहत असताना त्याने काही एजंटच्या मदतीने बोगस आधार, पॅनकार्ड, पासपोर्टसह इतर भारतीय दस्तावेज बनवले होते. अकरा वर्ष मिरारोड येथे राहिल्यानंतर तो २००८ साली अंधेरीतील लोखंडवाला संकुल, ग्रीन पार्क सोसायटीमध्ये राहण्यासाठी आला होता. अंधेरी रेल्वे स्थानकात त्याचे बाईक हेल्मेट विक्रीचे एक दुकान आहे.

- Advertisement -

अनधिकृतपणे कागदपत्रे बनवली 

अंधेरी परिसरात एक पाकिस्तानी नागरिक राहत असल्याची माहिती मिळताच विशेष शाखेच्या अधिकार्‍यांनी ओशिवरा पोलिसांच्या मदतीने अहमद आणि त्याची पत्नी अश्रफ यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत ते दोघेही पाकिस्तानी नागरिक तसेच गेल्या वीस वर्षांपासून मुंबई शहरात अनधिकृतपणे वास्तव्यास असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. अहमदने मुंबईत स्वतचा व्यवसाय सुरु केला होता तर त्याची पत्नी अश्रफ ही गृहिणी असून एक मुलगी विवाहीत आहे. ती सध्या अमेरिकेत वास्तव्यास आहे. दुसरी मुलगी शिक्षणासाठी गुजरात येथे गेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -