घरमुंबईनिवडणूक आयोग म्हणजे 'तवायफ' - संजय राऊत

निवडणूक आयोग म्हणजे ‘तवायफ’ – संजय राऊत

Subscribe

पालघर पोटनिवडणुकीत निवडणूक आयोगाने घेतलेल्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत शिवसेना नेते संजय राऊत यांनी आयोगाला ‘तवायफ’ अशी उपमा देत टीका केली. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा आरोप केला आहे. सामनातल्या अग्रलेखात देखील संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे.

पालघर मतदारसंघातील प्रचारसभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ऑडिओ क्लिप जाहीर सभेत ऐकवली होती. ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी साम, दाम, दंड, भेद अशी नीती वापरा, पण काहीही करुन निवडणूक जिंका, असे म्हटले होते. मुख्यमंत्र्याचे हे वक्तव्य आचारसहिंतेचा भंग असून निवडणूक आयोगाने त्यावर काहीच कारवाई केली नाही, असा आरोप राऊत यांनी केला आहे.

- Advertisement -

तसेच पालघर पोटनिवडणुकी दरम्यान सेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटताना रंगे हात पकडले. पण, त्यानंतर देखील निवडणूक आयोगाने कोणतीही कारवाई केली नाही. देशातल्या इतर राज्यातील निवडणुकीतही अशा गैरप्रकारांकडे देखील निवडणूक आयोगाने दुर्लक्ष केले आहे. यासर्व प्रकरणांमध्ये निवडणूक आयोगाची भूमिका तवायफ सारखी असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. दरम्यान शिवसेनेकडून जाहीर करण्यात आलेली मुख्यमंत्र्यांची ‘ती’ ऑडिओ क्लिप बनावट असल्याचे भाजपने म्हटले आहे.

३१ मे रोजी पालघरचा निकाल

भाजप आमदार चिंतामण वनगा यांच्या मृत्यूनंतर पालघरमध्ये २८ मे रोजी पोटनिवडणूक झाली. यावेळी भाजपवर नाराज असलेल्या चिंतामण वनगा यांच्या मुलाला शिवसेने उमेदवारी देत भाजपला शह देण्याचा प्रयत्न केला. शिवाय, निवडणूक प्रचारादरम्यान देखील भाजप-शिवसेना एकमेकांवर कुरघोडी करताना दिसले. पालघर पोटनिवडणुकीचा निकाल ३१ मे रोजी लागणार आहे. त्यामुळे पालघरमध्ये नक्की कोण बाजी मारणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -