Monday, August 10, 2020
Mumbai
28 C
घर महामुंबई पालघरमध्ये 63 जि.प. शाळांमध्ये सेमी इंग्रजी

पालघरमध्ये 63 जि.प. शाळांमध्ये सेमी इंग्रजी

Mumbai
जिल्हा परिषदेच्या शाळां

पालघर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 63 शाळांमध्ये पहिलीपासून सेमी इंग्रजी वर्गाची सुरुवात करण्यात आली आहे. जिल्हा परिषद शाळा आगवण केंद्र उमरोळी या शाळेत यउपक्रमाचे उद्घाटन पालघर पंचायत समितीच्या सभापती मनीषा पिंपळे यांच्या हस्ते पहिलीच्या वर्गात सेमी इंग्रजीची पाठ्यपुस्तके वाटप करून करण्यात आले. विशेष म्हणजे विशेष यासाठी लागणारी पुस्तके खरेदी करण्यासाठी शिक्षकांनी, केंद्रप्रमुखांनी व काही गावातील सरपंचांनी आपल्या खिशातील पैसे खर्च करून हातभार लावला आहे.

गटशिक्षणाधिकारी राजेंद्रकुमार खताळ यांनी जिल्हा परिषद शाळांमधील कमी होत चाललेली विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता तसेच मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा इंग्रजी बद्दलचा न्युनगंड याबाबत विचार करता जिल्हा परिषदेच्या शाळेमधून मुलांना पहिलीपासूनच इंग्रजीमध्ये शिक्षण मिळणे हे खूप महत्वाचे आहे व त्यादृष्टीने कृती करणे गरजेचे आहे. या विचारातून उपक्रमाची सुरुवात केली. जि. प. शाळांची गुणवत्ता वाढावी, जि.प. शाळा व खासगी शाळा यामधील अंतर कमी व्हावे, मराठी माध्यमाच्या मुलांमध्ये देखील इंग्रजीची गोडी वाढावी. ही या उपक्रमाची मुख्य उद्दिष्टे असल्याचे मत खताळ यांनी व्यक्त केले आहे.

त्यादृष्टीने तसे पाऊल उचलत प्रथम एक कॉन्फरन्स घेण्यात आली. या उपक्रमास यात केंद्रप्रमुख व केंद्रातील एक उपक्रमशील शिक्षक उपस्थित होते. या कॉन्फरन्समध्ये सर्व केंद्रप्रमुखानी व शिक्षकांनी उपक्रमास पाठींबा दर्शविला. सेमी इंग्रजी सुरू झालेल्या शाळांचे व्यवस्थापन करावे यासाठी मार्गदर्शक म्हणून हर्षा पाटील, केंद्रप्रमुख उमरोळी यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. त्यानुसार सर्व केंद्रप्रमुख, शिक्षक, आजी माजी पंचायत समिती सदस्य, सरपंच यांनी सेमी इंग्रजीचे वर्ग आपापल्या केंद्रात सुरू करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. एका केंद्रात दोन सेमी इंग्रजीच्या शाळा सुरू करून तालुक्यात 63 वरून 100 वर नेण्याचा आमचा मानस आहे, असे गटशिक्षण अधिकारी राजेंद्र कुमार खताळ यांनी सांगितले.