घरमुंबईHygienic Automatic पाणीपुरी; कोरोना काळात लढवली शक्कल!

Hygienic Automatic पाणीपुरी; कोरोना काळात लढवली शक्कल!

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून अनेक अटी व नियम आरोग्य विभागाकडून घालण्यात आले आहेत. त्यातील एक महत्त्वाचा म्हणजे सोशल डिस्टन्सिंग हा नियम आहे. लॉकडाऊनच्या काळात देशातील सर्व उद्योग, धंदे बंद झाले. त्यातच रस्त्यावरील चमचमीत आणि जिभेची भूक भागवणारे जंग फूडदेखील मिळणे बंद झाले. आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असून हळूहळू सर्व उद्योग, धंदे पूर्ववत येत आहेत. मात्र हायजिनच्या दृष्टीने अजूनही लोकं जंग फूडकडे वळलेली दिसत नाहीत. अशात एका पाणीपुरी विक्रेत्याने भन्नाट शक्कल लढवत हायजिनयुक्त ऑटोमॅटिक पाणीपुरी विक्री सुरू केली आहे. एका आयएएस अधिकाऱ्याने त्याच्या कल्पनेचे कौतुक करत त्याचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या पाणीपुरी विक्रेत्याचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून त्याच्या कल्पनेचे कौतुक होत आहे.

छत्तीसगडमधील रायपूर येथील स्वामी नावाच्या पाणीपुरी विक्रेत्याने हा जबरदस्त जुगाड केला आहे. पाणीपुरीमध्ये पाणी भरण्यासाठी त्याने एक मशीन बसवले आहे. ज्यामुळे खवय्यांना आपल्या आवडीनुसार आंबट-गोड, तिखट पाणी घेता येणार आहे. आयएएस अधिकारी अवनीष शरण यांनी हा व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केला आहे.

- Advertisement -

काय आहे व्हिडिओमध्ये 

अत्यंत हायजिनिक पद्धतीने हा पाणीपुरी विक्रेता खवय्यांना पाणीपुरीचा आस्वाद देण्याचा प्रयत्न करत आहे. अनेकांनी या पाणीपुरीवाल्याचे कौतुक केले आहे. व्हिडिओमधील खवय्याने त्याचे नाव विचारले असता स्वामी असे सांगितल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये हातमोजे घालून पाणीपुरी विक्रेता ग्राहकांना पुरी देतो आणि मशीनद्वारे पाणी घेण्यास सांगतो. ग्राहक अत्यंत आरामात त्याचे आवडते पाणी पुरीमध्ये घेतात आणि आनंदाने खातात.

- Advertisement -

हेही वाचा –

खासदार उदयनराजे भोसले कांदा निर्यातबंदीवर नाराज; पियुष गोयल यांना पाठवले पत्र

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -