घरमुंबईभाजप माझ्या रक्तात, सोडणार नाही पंकजा मुंडे यांचे स्पष्टीकरण

भाजप माझ्या रक्तात, सोडणार नाही पंकजा मुंडे यांचे स्पष्टीकरण

Subscribe

भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे हे अस्वस्थ असून लवकरच भाजपाला सोडचिठ्ठी देतील, असे वृत्त गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु झाली आहे. या चर्चेला अखेर पंकजा मुंडे यांनी पूर्णविराम लावला असून बंडखोरी आपल्या रक्तात नसल्याचे स्पषट करताना आपण भाजप सोडणार नसल्याचे जाहीर केले आहे. पक्ष सोडणार असल्याचे वृत्त ही निव्वळ अफवा असल्याचे मत देखील यावेळी केले. तत्पूर्वी, मंगळवारी दुपारी भाजपाचे माजी मंत्री विनोद तावडे आणि राम शिंदे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली.

भाजपाच्या माजी मंत्री आणि गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे यांना विधानसभा निवडणुकीत पराभवास सामोने जावे लागले होते. त्यानंतर व्यथित झालेल्या पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुक पेजवर १२ डिसेंबरला भगवनगडावर आपण भूमिका स्पष्ट करु, असे स्पष्ट केले. या मॅसेजाचा विपर्यास केला गेल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला असल्याचे मत पंकजा मुंडे यांनी मंगळवारी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. या फेसबुक पेजच्या पोस्टनंतर पहिल्यांदाच ते बोलत होत्या. तर आपण आत्मचिंतनासाठी आणि स्वतःशी बोलण्यासाठी वेळ हवा असल्याचं सांगितले

- Advertisement -

यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाले की, मी 12 डिसेंबरला बोलेल असे मी सांगितलं होते. मला आत्मचिंतनासाठी आणि स्वतःशी बोलण्यासाठी वेळ हवा आहे. तो वेळ मला दिला पाहिजे. मी ती पोस्ट आत्ता केली आणि आत्ताच त्यावर बोलणे, भाष्य करणे मला शक्य नाही. पण इतकंच सांगते की मी दरवर्षी गोपीनाथ गडावर मोठा कार्यक्रम घेते. माझ्या पोस्टवर सुरुवातीला सर्वच चॅनलने व्यवस्थित बातमी दिली. मात्र, एक दोन वर्तमानपत्रांनी पंकजा मुंडे पक्ष सोडणार अशी बातमी केली. यानंतर या सर्व चर्चेला वेगळा सूर आला आणि वेगळ्या पद्धतीने हाताळणी सुरु आहे. त्यामुळे मी खरंच खूप दुःखी आणि व्यथित असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

तर माझ्याकडं उमेदवार येऊन अक्षरशः अश्रू आणायचे आणि सभा घेण्याची मागणी करायचे. मी अत्यंत पोटातून समर्पनाने सेवा केलेली आहे. कधीही कुठल्या पदासाठी लाचारी स्वीकारलेली नाही. तसंच कोणतंही पद मागण्यासाठी दबावतंत्र वापरलं नाही. हे माझ्या रक्तात नाही. त्यामुळे या ज्या चर्चा सुरु आहेत त्यांनी मला व्यथित केलं. म्हणूनच मला आत्मचिंतनासाठी आणि माझ्या लोकांशी काय बोलायचं यावर विचार करण्यासाठी वेळ नक्की दिला पाहिजे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

- Advertisement -

तावडे – शिंदे यांनी घेतली भेट
गेल्या अनेक दिवसांपासून पंकजा मुंडे हे भाजप सोडणार असल्याचे वृत्त वार्‍यासारखे पसरले होते. त्यामुळे भाजपच्या गोटात ही चिंतेचे वातावरण पसरले होते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ते पक्ष सोडणार नाही, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर मंगळवारी माजी मंत्री विनोद तावडे आणि राम शिंदे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना विनोद तावडे म्हणाले की, पक्षाशी एकनिष्ठ असणारा परिवार, पक्षाशी एकनिष्ठ असणार्‍या पंकजा मुंडे यांना अशा प्रकारच्या गोष्टी ऐकाव्या लागतात. त्यामुळे स्वाभाविकपणे दुःख होतं. ते दुःख त्यांना नक्की आहे. पंकजा मुंडे पक्षाच्या अतिशय चांगल्या कार्यकर्त्या आहेत. त्यामुळे त्या 12 डिसेंबरला त्यांच्या महाराष्ट्रातील सर्व अनुयायांना योग्य संदेश देतील, याची मला खात्री आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -