घरमुंबईनवी मुंबईपाठोपाठ वसईमध्ये पानमसाला जप्त

नवी मुंबईपाठोपाठ वसईमध्ये पानमसाला जप्त

Subscribe

वसईमध्ये गुरुवारी एका गोडाऊनमधून तब्बल २८ लाखांपेक्षा जास्त किमतीचा पानमसाला अन्न व औषध प्रशासनाकडून जप्त करण्यात आला. एफडीएच्या दक्षता पथकाने छापा टाकून ही कारवाई केली आहे.

वसईमध्ये गुरुवारी एका गोडाऊनमधून तब्बल २८ लाखांपेक्षा जास्त किमतीचा पानमसाला अन्न व औषध प्रशासनाकडून जप्त करण्यात आला. एफडीएच्या दक्षता पथकाने छापा टाकून ही कारवाई केली आहे. राज्यात बंदी असलेला ३५ लाखांपेक्षा जास्त किमतीचा पानमसाला आठवडाभरापूर्वी नवी मुंबईतून जप्त करण्यात आला होता.

अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता विभागाला मिळालेल्या माहितीच्या आधारे १५ ऑक्टोबरला सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास वसईतील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेजवळील लोढाधाम येथील द फॅल्ग कंपनी शेजारील मोकळ्या जागेवरील गोडाऊनमध्ये छापा घातला. या छाप्यात राज्यात बंदी असलेला पान मसाला व सुगंधित तंबाखू या पदार्थांचा २८ लाख १९ हजार ७७२ किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. यावेळी श्रवण वैधनाथ साहनी याला ताब्यात घेण्यात आले आहे. हा साठा इक्बाल व राजू नामक व्यक्तीच्या मालकीचा असल्याचे समजते. या प्रकरणी आरोपींविरुद्ध अन्न सुरक्षा व मानदे अधिनियम व भारतीय दंडसंहिता अंतर्गत गुन्ह्यासाठी प्रथम खबरी अहवाल नोंदविण्यात आला आहे.

- Advertisement -

अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, राज्यमंत्री राजेंद्र येड्रावकर व आयुक्त अरुण उन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सह आयुक्त (दक्षता) सुनील भारद्वाज यांच्या नियंत्रणाखाली अन्न सुरक्षा अधिकारी आर. डी. मुंडे, एम. आर. महांगडे, डी. एस. साळुंखे, डी. एस. महाले, बी. एन. चव्हाण, पी. पी. सूर्यवंशी यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली. चार दिवसांपूर्वीच दक्षता पथकाने नवी मुंबईतील महापे येथे तीन वाहनांवर छापा टाकून राज्यात बंदी असलेला विमल पान मसाला व व्ही-१ सुगंधित तंबाखू या पदार्थांचा ३५ लाख ५३ हजार ३१२ रुपयांचा साठा जप्त केला होता.

प्रतिबंधित अन्न पदार्थांच्या गोदामाबाबत अथवा वाहतुकीबाबत कोणतीही माहिती अथवा तक्रार असल्यास त्याची माहिती टोल फ्री क्र.१८००२२२३६५ वर अन्न व औषध प्रशासनाला देण्याचे आवाहन सह आयुक्त (दक्षता) सुनील भारद्वाज यांनी नागरिकांना केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -