घरमुंबईमुलीला दिले मेणबत्तीचे चटके, आईला अटक!

मुलीला दिले मेणबत्तीचे चटके, आईला अटक!

Subscribe

कळंबोली पोलिस ठाण्यात याबाबत मुलीच्या वडिलांनी तक्रार नोंदवली असून त्याआधारे कळंबोली पोलिसांनी मुलीची आई व काकू या दोघींनाही अटक केली आहे. 

कुठलीही आई तिच्या पोटच्या लेकराला जीपवापाड जपते असं म्हणतात. आपल्या मुलांना कुठल्याही प्रकारची ईजा होऊ नये यासाठी आई डोळ्याच तेल घालून त्यांचं रक्षण करत असते. मात्र, नवी मुंबईतील कळंबोली येथे या सगळ्या समजूतींना छेद देणारा एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कळंबोलीत राहणाऱ्या एका महिलेने तिच्या पोटच्या मुलीला मेणबत्तीने चटके दिल्याची घटना उघड झाली आहे. मुलगी ऐकत नाही आणि खूप मस्ती करते म्हणून तिला ही शिक्षा दिल्याचं तिच्या आईचं म्हणणं आहे. दरम्यान, या अमानुष प्रकारात पीडित मुलीच्या आईला तिची चुलती म्हणजेच मुलीची काकूसुद्धा मदत करत असल्याचं तपासात समोर आलं आहे. कळंबोली पोलिस ठाण्यात याबाबत मुलीच्या वडिलांनी तक्रार नोंदवली असून त्याआधारे कळंबोली पोलिसांनी मुलीची आई व काकू या दोघींनाही अटक केली आहे.

सविस्तर प्रकरण…

कळंबोलीतील सेक्टरर १४ येथील श्री विनायक सोसायटीमध्ये राहणारे घनश्याम नंदजी यादव हे एक भाजी विक्रेते आहेत. साक्षी ही त्यांचीची पाच वर्षांची मुलगी असून ती स्वभावाने खोडकर आणि मस्तीखोर आहे. मात्र, ही मस्ती सहन होत नसल्यामुळे साक्षीची आई अनिता यादव आणि चुलती रिंकी यादव या दोघींनी मिळून हे अमानुष कृत्य केल्याचं तपासात उघड झालं. साक्षीच्या मस्तीला आवर बसावा यासाठी शिक्षा म्‍हणून या दोन्ही महिलांनी ५ वर्षांच्या या चिमकुलीला मेणबत्तीचे चटके दिले. दरम्यान, पत्नी आणि भावजयीचा हा क्रूरपणा लक्षात येताच साक्षीच्या वडिलांनी तात्काळ कळंबोली पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत कळंबोली पोलिसांनी त्वरित बालन्याय अधिनीयम २००० चे कलम ७५ अन्वये दोन्ही महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करुन घेतला आणि काही वेळातच त्यांना अटकही केली. दरम्यान, पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण याप्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -