परळ-भोईवाडा विद्युत दाहिनी १० दिवस राहणार बंद

१० दिवसात विद्युत दाहिनीची अत्यावश्यक देखभाल दुरुस्ती करणार. पारंपरिक पद्धतीची लाकूड आधारित चिता सेवा असणार कार्यरत

Paral-Bhoiwada electric crematory will closed for 10 days

मुंबई महानगरपालिकेच्या ‘एफ दक्षिण’ विभागातील परळ भोईवाडा परिसरात असणाऱ्या स्मशानभूमीतील विद्युत दाहिनी १० दिवस बंद असणार आहे. या विद्युत दाहिनीची देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे. यासाठी १४ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर २०२० पर्यंत ही विद्युत दाहिनी बंद असणार आहे. मात्र, याला पर्याय म्हणून पारंपरिक पद्धतीची लाकूड आधारित चिता सेवा सुरू राहणार आहे.

१४ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर या १० दिवसांच्या कालावधी दरम्यान प्रामुख्याने मोडकळीस आलेल्या विद्युत दाहिनीची चिमणी बदलण्यात येणार आहे. शिवाय, इतर आवश्यक कामे करण्यात येणार आहे. परंतु, या कालावधीदरम्यान पारंपरिक पद्धतीची लाकूड आधारित चिता सेवा सुरू राहणार आहे. तसेच वरील कालावधीदरम्यान विद्युत दाहिनी आधारित सेवा ही नजीकच्या शिवाजी पार्क, शीव आणि रे रोड येथील स्मशानभूमीत सुरू राहणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे.