घरमुंबईविघ्न टळले; शेषनागावर विराजमान 'परळचा राजा' उंचीमुळे पुलाखाली अडकला

विघ्न टळले; शेषनागावर विराजमान ‘परळचा राजा’ उंचीमुळे पुलाखाली अडकला

Subscribe

अखेर मूर्तीची दिशा बदलल्यानंतर परळचा महाराजा झाला मार्गस्थ

मुंबईसह इतर उपनगरातील गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुका मार्गस्थ झाल्या आहेत. यामध्ये गणेशगल्ली येथील मुंबईचा राजा असो किंवा लालबागचा राजा असो, या बाप्पांना निरोप देण्याकरिता गणेश भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. यासह बाप्पा आपल्या गावी जाणार म्हणून अनेकांचे डोळे देखील पानावले आहे. मोठ मोठाल्या बाप्पांना १० दिवस सलग मनोभावे सेवा केल्यानंतर त्यांना निरोप देताना अंतःकरण जड होऊन ऊर देखील भरून येतो. मात्र या मोठाल्या उंचीच्या बाप्पांचे विसर्जन दरम्यान होणारे हाल खऱ्या भक्ताला बघवत नाही.

उंचीच्या रचनेमुळे मिरवणुकीत अडथळा

असाच प्रकार मुंबईतील बाप्पा विसर्जनाला मार्गस्थ होत असताना बघायला मिळाला. विष्णूरुपात असलेल्या या गणेशमुर्ती लालबाग उड्डाणपुलाखालून जात असताना त्याची उंची अधिक असल्याने बाप्पा पुलाखाली जवळपास १० मिनिटं अडकून राहिला. भली मोठी शेषनागावर विराजमान असलेली ही लोभस गणेश मुर्ती फक्त तिच्या उंचीच्या रचनेमुळे अडथळा ठरली.

- Advertisement -

बाप्पाला सुखरूप मार्गस्थ करण्यासाठी भक्तांची धडपड

लालबागच्या पुलाखाली परळ राजा त्याच्या उंचीमुळे अडकल्याने त्याला काढण्यासाठी गणेश भक्तांची एकच धडपड सुरू होती. ही मुर्ती शेषनागावर विराजमान आहे. हीच शेषनागाची रचना अडथळा ठरल्यानंतर मिरवणुकीचा मार्ग बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. मूर्तीची असणारी उंची लक्षात घेऊन त्यासाठी सोयीचा असा मार्ग काढण्यात आला, असे असताना मूर्तीला कोणताही धक्का पोहचू नये म्हणून सर्वच प्रयत्न करत होते. अखेर मूर्तीची दिशा बदलल्यानंतर परळचा महाराजा मार्गस्थ झाला.

- Advertisement -

अशी आहे परळच्या राजाची रचना

२३ फुटांपेक्षा अधिक असणारी परळच्या राजाची उभी मुर्ती शेषनागावर विराजमान आहे. विष्णूरुपात ही मुर्ती शेषनागावर विराजमान असलेल्या रूपात अगदी लोभस रूपात विसर्जन मिरवणुकीत मार्गस्थ झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -