घरमुंबईमुंबई पोलीस आयुक्तपदी परमबिर सिंह

मुंबई पोलीस आयुक्तपदी परमबिर सिंह

Subscribe

गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या मुंबई पोलीस आयुक्त पदावर परमबीर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देशात आणि महाराष्ट्रातही प्रतिष्ठेच्या मानल्या जाणार्‍या आयुक्तपदी कोण, याविषयीच्या चर्चेला सिंह यांच्या नियुक्तीनंतर विराम मिळाला. महाराष्ट्रच नव्हे तर देशातील अत्यंत महत्त्वाचं व प्रतिष्ठेचं पद असलेल्या मुंबई पोलीस आयुक्तपदी अनेकांच्या नावाची चर्चा होती. महाविकास आघाडीने परमबिर सिंह यांच्या नावाला पहिली पसंती दिल्याने त्यांच्याकडे शहराच्या पोलीस प्रमुख पदाचा भार देण्यात आला आहे.

सुमारे ३२ वर्षांच्या पोलीस दलातील सेवेत विविध महत्त्वाच्या जबाबदार्‍या पेलणारे परमबीर सिंह हे १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. राज्यातील धडाडीचे पोलीस अधिकारी म्हणून परमबिर सिंह यांचा लौकिक आहे. पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी काही काळ ठाणे पोलीस दलाची जबाबदारी पेेलली होती. ठाण्यातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यात त्यांची मेहनत कामी आल्याची चर्चा तेव्हा होती. या शहरातील गुन्ह्यांमध्ये १० टक्क्यांची घट झाली होती. राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाचे उपप्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी स्वीकारली होती. मुळ हरियाणाच्या फरिदाबाद जिल्ह्यातील पावटा मोहबताबाद हे त्यांचे मूळ गाव. होशियार सिंह हे त्यांचे वडील. ते हरियाणाच्या नागरी सेवेतील अधिकारी होते.

- Advertisement -

त्यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे पोलिसांनी मीरा रोड कॉल सेंटर प्रकरण, सैन्य भरती प्रकरण, अमेरिकेच्या ड्रगविरोधी पथकाने लक्ष घातलेल्या २ हजार कोटींचं ड्रग प्रकरण, बेकायदेशीर कॉल रेकॉर्डिंग अशा अनेक प्रकरणांचा तपास केला. सिंह यांनी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे उपप्रमुख म्हणूनही काम पाहिलं आहे. परमबीर सिंह यांनी चंद्रपूर आणि भंडार्‍याचे पोलीस अधीक्षक म्हणूनही काम केलं आहे. महाराष्ट्र कायदा व सुव्यवस्थेचे अतिरिक्त डीजीपी (DGP) म्हणूनही काम पाहिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -