घरमुंबईपरळ टर्मिनस मुंबईकरांसाठी सज्ज

परळ टर्मिनस मुंबईकरांसाठी सज्ज

Subscribe

येत्या १० दिवसांत लोकल सुटणार

येत्या १० दिवसांत परळ टर्मिनस प्रवाशांसाठी खुले होणार आहे. परळ टर्मिनसचे अखेर काम पूर्ण झाले आहे. सुशोभीकरणाचे शेवटचे काम बाकी आहे. त्यानंतर शुभारंभाच्या मुहूर्तावर या टर्मिनसमधून लोकल सोडण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या प्रयत्नाने हे शक्य झाले आहे.

मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एमआरव्हीसी) मुंबई नागरी परिवहन प्रकल्प-२ अंतर्गत २०१५ मध्ये परळ टर्मिनसची घोषणा करण्यात आली होती. अखेर येत्या १० दिवसांत मुंबईकरांसह रेल्वे प्रवाशांना परळ टर्मिनस प्रत्यक्ष वापर करण्यासाठी खुले होणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ९० कोटींचा खर्च करण्यात आला आहे. हे काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेने सतत प्रयत्न केले. या परळ टर्मिनसमुळे दादर स्थानकातील गर्दीतून रेल्वे प्रवाशांची सुटका होणार आहे. दादरहून सुटणार्‍या सुमारे ५० टक्के लोकल फेर्‍या परळ उपनगरीय टर्मिनसवरून सुरू करण्यात येणार आहेत.

- Advertisement -

दादर स्थानकातून सध्या ३४ लोकल फेर्‍या सुटतात. त्यापैकी कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, कर्जत आणि टिटवाळा, आसनगाव, कसारा मार्गावरील लोकल फेर्‍या परळ टर्मिनसवरून सुटणार आहेत. मध्य रेल्वे परळ टर्मिनसवरून सुटणार्‍या लोकल सेवांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करणार आहे. मध्य रेल्वेने मेगा ब्लॉक घेऊन परळ टर्मिनसचे काम पूर्ण केले आहे. ज्यात रुळांसह, सिग्नल यंत्रणा, फलाट, ओव्हर हेड वायर (ओएचई) अशी महत्त्वाची कामे करण्यात आली आहेत. सद्यःस्थितीत परळ टर्मिनसचे ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे. टर्मिनसची रंगरंगोटी व सजावट असे फायनल टच देण्याचे काम सुरू आहे. लवकरच १० दिवसांच्या आत या परळ टर्मिनसचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

परळ टर्मिनसचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. आता या परळ टर्मिनसला फायनल टच देण्याचे काम सुरू आहे. येत्या १० ते १५ दिवसांत हे टर्मिनस प्रवाशांसाठी खुले करण्यात येणार आहे.
– सुनील उदासी, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

- Advertisement -

परळ टर्मिनसची वैशिष्ठ्ये
– परळ टर्मिनसवर एकूण तीन पादचारी पूल
– ज्येष्ठ आणि महिला प्रवाशांसाठी सरकते जिने
– प्रवाशांसाठी लिफ्ट सुविधा
– परळ टर्मिनस-कल्याण मार्गावर १५ डब्यांची लोकल
– १५ डब्यांच्या लोकल चालवण्यासाठी आवश्यक फलाट
– अत्याधुनिक आणि उच्च क्षमतेचे पांढर्‍या दिव्यांचे इंडिकेटर्स
– आधुनिक प्रसाधन गृह

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -