परळमध्ये आग्नितांडव सुरुच आहे. परळमध्ये गोडाऊनला लागलेली भीषण आग विझवण्यात यश आले आहे. प्रिमियर टॉकीजजवळ इमारतीच्या तळमजल्यावर असणाऱ्या घडाळ्याच्या गोडाऊनला आग लागली होती. फायर ब्रिगेडच्या चार फायर इंजिन आणि दोन वॉटर टँकरच्या सहाय्याने आग विझवण्यात आली आहे. मात्र या आगीमध्ये संपूर्ण गोडाऊन जळून खाक झाले आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव इमारतीमधील रहिवाश्यांना बाहेर काढण्यात आले होते. मागच्या आठवड्यातच परळच्या क्रिस्टल टॉवरच्या १२ व्या मजल्यावर आग लागली होती. या आगीमध्ये ४ जणांचा मृत्यू तर २३ जण जखमी झाले होते.
परळमध्ये प्रिमियर टॉकीज येथील एका इमारतीच्या तळमजल्यावरील घड्याळ्याच्या गोडाऊनला आग लागली होती. फायर ब्रिगेडच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आली असल्याचे समजते. #ParelFire https://t.co/9PpLirsi2b pic.twitter.com/qL6MOobFM8
— My Mahanagar (@mymahanagar) August 27, 2018
#Mumbai: Fire breaks out in a building near Premier Talkies in Parel. 4 fire tenders rushed to the spot, more details awaited
— ANI (@ANI) August 27, 2018