शाळा वाचवण्यासाठी पालक, शिक्षकांचे आंदोलन

Mumbai
पालक, शिक्षकांचे आंदोलन

राज्य सरकारच्या 50 टक्केे अनुदानाचे कारण देत अनेक वर्षांपासून पालिकेकडून 104 खासगी प्राथमिक शाळांना अनुदान देण्यास टाळाटाळ होत आहे. अनुदानासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून शाळांची यादीही जाहीर केली, परंतु त्याकडे पालिका दुर्लक्ष करत असल्याने अखेर पालक, शिक्षकांनी सोमवारी बेमुदत उपोषण पुकारले.

अनुदान देण्याबाबत मुंबईतील 104 खासगी प्राथमिक शाळांची यादी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून जाहीर केली होती. शाळांना अनुदान देण्यासाठी पालिकेने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला. मात्र, 2004 मध्ये राज्य सरकारने आपली जबाबदारी झटकली. त्यामुळे शाळांना 100 टक्के अनुदान देण्याची भूमिका पालिकेच्या गटनेत्यांनी घेतली.

त्यानुसार 9 ऑक्टोबरला ठरावाच्या सूचनेनुसार अनुदान प्रस्ताव मंजूर केला, परंतु अनेक दिवस उलटले तरी प्रशासकीय मंजुरी न मिळाल्याने महासभेत हा विषय तातडीने घेऊन धोरणात्मक निर्णय घ्यावा व प्रशासकीय मंजुरी द्यावी यासाठी शिक्षक, पालक यांनी सोमवारी आझाद मैदानात तीव्र आंदोलन केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here