घरमुंबईखासगी वाहनांना सोसायट्यांमध्ये पार्किंग

खासगी वाहनांना सोसायट्यांमध्ये पार्किंग

Subscribe

मुंबई महापालिकेने खासगी इमारतींमधील वाहनतळांमध्ये सशुल्क वाहने उभी करण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे खाजगी वाहनांना अतिरिक्त वाहनतळ उपलब्ध होण्यासोबतच सोसायट्यांना देखील उत्पन्नाचा एक अभिनव पर्याय उपलब्ध होणार आहे.

खाजगी निवासी इमारती तसेच सोसायट्यांमध्ये असणार्‍या वाहनतळांच्या ज्या जागा दिवसा रिकाम्या असतात, त्याजागी बाहेरील वाहने शुल्क आकारुन उभी करता येणार आहे. मुंबई महापालिकेने खासगी इमारतींमधील वाहनतळांमध्ये सशुल्क वाहने उभी करण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे खाजगी वाहनांना अतिरिक्त वाहनतळ उपलब्ध होण्यासोबतच सोसायट्यांना देखील उत्पन्नाचा एक अभिनव पर्याय उपलब्ध होणार आहे. त्यासाठी अधिकाधिक सोसायट्यांनी या योजनेत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी केले आहे.

पार्किंग पूल तयार केले जाणार

मुंबईतील खाजगी निवासी सोसायट्यांच्या वाहनतळांमधील अनेक जागा दिवसा रिकाम्या असतात. तर त्याचवेळी त्या परिसरात बाहेरुन येणाऱ्या गाड्यांना मात्र अनेकदा वाहन उभे करण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. ज्यामुळे अनेकदा वाहने रस्त्यालगत उभी केली जातात. परिणामी, रस्यावरील वाहतूक मंदावण्यासह वाहन चालकांसह मालक यांना आर्थिक दंडही भरावा लागू शकतो. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकेच्या ‘मुंबई वाहनतळ प्राधिकरण’यांच्याद्वारे खाजगी निवासी सोसायट्यांमधील वाहनतळाच्या दिवसा रिकाम्या असणार्‍या जागांची माहिती घेऊन ‘पार्किंग पूल’तयार करण्यात येत आहे. यामध्ये सहभागी होण्यास इच्छुक असणाऱ्या सोसायट्यांना त्यांच्या वाहनतळांमध्ये दिवसा मोकळ्या असणाऱ्या जागा खाजगी वाहनांना भाड्याने देता येणार आहेत. यामुळे वाहनतळांचा अधिक परिपूर्ण वापर होण्यासह खाजगी सोसायट्या तसेच इमारतींना उत्पन्नाचा एक अभिनव मार्ग खुला होणार आहे. या योजनेत नोंदणी करणे हे खाजगी सोसायट्यांना किंवा इमारतींना पूर्णपणे ऐच्छिक आहे. तसेच नोंदणी केल्यास उपलब्ध वाहनतळ जागांची माहिती महापालिकेच्या ‘MCGM 24 x 7’ या अॅपवर उपलब्ध करुन दिली जाणार आहे. ज्यामुळे गरजु वाहन चालक किंवा वाहन मालक यांना वाहनतळ शोधणे सोपे होणार आहे. तरी खाजगी निवासी सोसायटी आणि इमारतींनी या योजनेत नाव नोंदणी करावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. यानुसार सहभागी होणार्‍या निवासी सोसायटी किंवा इमारतीशी संबंधितांशी चर्चा करुन वाहनतळ विषयक दर ठरविण्यात येतील, असे मुंबई वाहनतळ प्राधिकरणाद्वारे कळविण्यात आले आहे.

- Advertisement -

विभाग कार्यालयांच्या सहायक आयुक्तांवर जबाबदारी

अधिकाधिक सोसायट्यांना या योजनेत सहभागी होता यावे, यासाठी महापालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांच्या सहाय्यक आयुक्तांनी आपल्या कार्यक्षेत्रातील निवासी सोसायट्यांच्या बैठका घ्याव्यात, असे आदेश महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी दिले आहेत.


हेही वाचा – एस.व्ही,रोडसह न्यू लिंकरोडवर पार्किंग कारवाईचा बोजवारा


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -