घरलोकसभा २०१९ग्राउंड रिपोर्टयुतीच्या उमेदवाराचे पार्थ पवार यांना आव्हान !

युतीच्या उमेदवाराचे पार्थ पवार यांना आव्हान !

Subscribe

मावळ लोकसभा मतदार संघात आतापर्यंत शिवसेनेचे असून गेल्या दोन लोकसभा निवडणुकांत युतीचा उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आला आहे. त्यामुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत युतीला कडवी टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून तयारी केली जात आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे मावळ मतदार संघातून लढणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. परंतु,अद्याप त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा झाली नसली, तरी पार्थ पवार यांनी स्थानिक नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. तसेच पार्थ पवार हे निवडणूक लढवणार असतील तर पवार घरण्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.

२००९ साली मावळ लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी पक्षाकडून आझम पानसरे यांना तर युतीकडून गजानन बाबर यांना उमेदवारी देण्यात आली होती. या अटीतटीच्या लढतीत ८० हजार मतांनी राष्ट्रवादीचे आझम पानसरे हे पराभूत झाले होते. २०१४ च्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीकडून खासदार श्रीरंग बारणे यांना मैदानात उतरवले होते. त्यांच्याविरोधात आमदार लक्ष्मण जगताप, मनसे आणि शेकाप यांचे उमेदवार होते. बारणे यांनी बाजी मारत तब्बल १ लाख ५९ हजार मतांनी विजय मिळवला होता. गेल्या दोन निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पराभव पाहावा लागला आहे. पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि आपापसातील मतभेद त्याचबरोबर २०१४ मध्ये आलेली मोदी लाट हे राष्ट्रवादीच्या पराभवाचे महत्वाचे कारण मानले जात आहे.

- Advertisement -
Maval
मावळ लोकसभा मतदारसंघाचा नकाशा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राहुल नार्वेकर यांना तिसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. त्यांचा दारुण पराभव झाला होता.हे राजकीय गणित पाहता यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे लोकसभा निवडणुकीत येण्याची चिन्हे आहेत. अद्याप त्यांच्या नावाची अधिकृतरित्या घोषणा करण्यात आलेली नाही. मावळमध्ये ऐकून सहा विधानसभा मतदार संघ आहेत. तीन रायगड जिल्ह्यात येतात.तर तीन पुणे जिल्ह्यातील आहेत. पिंपरीला शिवसेनेचा आमदार, चिंचवड आणि मावळला भाजपचे आमदार आहेत तर कर्जतला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार तसेच पनवेलला भाजप आमदार आणि उरणमध्ये शिवसेनेचा आमदार आहेत.

मावळ लोकसभा मतदार संघ हा लांब आणि विस्तीर्ण आहे. यात मतदारांची २२ लाख २३ हजारच्या वर संख्या आहे.पैकी,शहरी म्हणजचे पिंपरी-चिंचवड शहरात मोठी, दाट मतदारांची संख्या आहे.मावळ लोकसभा मतदार संघात ग्रामीण आणि शहरी भाग येतो.पिंपरी-चिंचवडसह मावळमधील बेकायदा बांधकाम,शास्तिकर,मावळबंद नळ योजना, वाढती गुन्हेगारी,संरक्षण खात्यातील प्रलंबित प्रश्न,शेतकर्‍यांच्या जमिनींचा परतावा असे विविध प्रश्न या मतदार संघात आहेत. बुधवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मावळ लोकसभा मतदार संघातील उमेदवारी बाबत गुगली टाकली आहे. यावेळी ते व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते.तेव्हा, दोन दिवसांत अध्यक्ष जयंत पाटील हे उमेदवार घोषित करतील तोपर्यंत प्रचारात राष्ट्रवादी उमेदवार,असाच शब्द वापरा अशी सूचना शरद पवार यांनी सर्वांना केली आहे.

- Advertisement -

2009 च्या निवडणुकीत मिळालेली मते

एकूण मतदार – १६ लाख ४३ हजार ४०८

गजानन बाबर – शिवसेना – ३ लाख ६४ हजार ८५७ (विजयी)

आझम पानसरे – राष्ट्रवादी – २ लाख ८४ हजार २३८

2014 च्या निवडणुकीत मिळालेली मते

एकूण मतदार – १९ लाख २२ हजार ३४३

श्रीरंग बारणे ( शिवसेना) – ५ लाख १२ हजार २२६ (विजयी)

लक्ष्मण जगताप (शेकाप+ मनसे) – ३ लाख ५४ हजार ८२९

राहुल नार्वेकर ( राष्ट्रवादी काँग्रेस) – १ लाख ८२ हजार २९३

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -