घरमुंबईस्वच्छता स्पर्धेत सहभागाकरता 16 डिसेंबरपर्यंत भरावेत अर्ज

स्वच्छता स्पर्धेत सहभागाकरता 16 डिसेंबरपर्यंत भरावेत अर्ज

Subscribe

नवी मुंबई महापालिकेचे आवाहन

‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत नवी मुंबई महापालिकेमार्फत राबविण्यात येत असलेले स्वच्छता विषयक उपक्रम जास्तीत जास्त लोकाभिमुख होण्याकरता तसेच नागरिकांच्या स्वच्छताविषयक वर्तणुकीमध्ये बदल घडविण्याकरता माहिती, शिक्षण, प्रसार व जनजागृती अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील रहिवाशांना कचरा वर्गीकरण व प्रक्रिया तसेच इतर स्वच्छता विषयक उपक्रम राबविण्यास प्रोत्साहन देणे आणि यामध्ये सातत्य ठेवून रहिवाशांच्या सवयीत बदल घडविण्याच्या दृष्टीने स्वच्छता स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

एप्रिल ते जून व जुलै ते सप्टेंबर या कालावधीत शहरातील हॉटेल्स, शाळा, गृहनिर्माण संस्था , मार्केट असोसिएशन, शासकीय कार्यालये, हॉस्पिटल या प्रमुख सहा गटांमध्ये स्वच्छता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या धर्तीवर ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत या स्वच्छता स्पर्धांचे आयोजन करावयाचे आहे. तथापि या स्पर्धेत सहा गटांव्यतिरिक्त स्वच्छ प्रभागात शहरी क्षेत्रातील प्रभाग, गावठाण भागातील प्रभाग व झोपटपट्टी क्षेत्रातील प्रभाग असे 3 गटांचा देखील नव्याने समावेश कराण्यात येत आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये एकूण सात गटांमध्ये स्वच्छता स्पर्धा घेण्यात येत आहेत.

- Advertisement -

या स्पर्धेचे गुणांकन करण्याकरिता निकष निश्चित करण्यात आले असून त्यामध्ये प्रामुख्याने कचरा वर्गीकरण,कचर्‍यावर कचरा निर्मितीच्या ठिकाणीच प्रक्रिया करणे, शौचालय व्यवस्था, स्वच्छता विषयक पायाभूत सुविधा इत्याही बाबींवर भर देण्यात आलेला आहे. या स्वच्छता स्पर्धेमध्ये सहभागी होऊ इच्छिणार्‍या संस्थांनी 5 ते 16 डिसेंबर 2019 या कालावधीत संबंधित विभाग कार्यालयात अर्ज दाखल करावयाचे आहेत. स्पर्धेचे प्रत्यक्ष स्थळ परिक्षण व गुणांकन 16 ते 21 डिसेंबर 2019 या कालावधीत करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -