घरमुंबईपरदेशी युवकांचा पासपोर्ट, व्हिसा आगीत जळून राख

परदेशी युवकांचा पासपोर्ट, व्हिसा आगीत जळून राख

Subscribe

नेरुळ सेक्टर ६ येथील पामबीच रोडवरील मॅरेडियन टॉवरमध्ये गुरुवारी रात्री अचानक आग लागली. सुदैवाने आग लागली तेव्हा फ्लॅटमध्ये कुणीही नव्हते. या फ्लॅटमध्ये राहणारे दोन्ही युवक परदेशात राहत असून ते जवळच राहणार्‍या आपल्या मित्रांकडे जेवणासाठी गेले होते. त्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला. सुरुवातीला आग भडकल्यानंतर जवळपास एक ते दीड तास फ्लॅटमध्ये आग भडकली. त्यामुळे फ्लॅटमधील सर्व सामान जळून खाक झाले. विशेष म्हणजे फ्लॅटमधील या दोन परदेशी युवकांचे पासपोर्ट, व्हिसा आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांचीही राख झाली.

या प्रकरणाची नोंद नेरूळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. रात्री उशिरा लागलेल्या आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मॅरेडियन टॉवरमधील १४ व्या मजल्यावर ही आग भडकली असता अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली. सुरुवातीला आलेल्या दोन गाड्यांमध्ये हायड्रोलिक शिडी नसल्याने आग विझवण्यासाठी मोठा अडथळा निर्माण झाला. अखेर, तिसर्‍या गाडीत हायड्रोलिक शिडी (क्रेन) आल्यानंतर इतर टँकरच्या सहाय्याने पाण्याचा उंच मारा करून ही आग आटोक्यात आणण्यात आली. त्यानंतरही घरात राहत असलेल्या रहिवाशांची माहिती घेण्यात आली असता त्यात दोन परदेशी युवक राहत असल्याचे समोर आले.

- Advertisement -

आग लागली तेव्हा फ्लॅटमध्ये कुणीही नव्हते. ते जवळच राहणार्‍या आपल्या मित्रांकडे जेवणासाठी गेले होते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सुरुवातीला आग भडकल्यानंतर जवळपास एक ते दीड तास फ्लॅटमध्ये आग भडकली. त्यामुळे फ्लॅटमधील सामान जळून खाक झाले आहे. विशेष म्हणजे, फ्लॅटमधील या दोन्ही परदेशी युवकांचे पासपोर्ट, व्हिसा आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांचीही राख झाली आहे. दरम्यान, पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली असून रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरूच होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -