घरमुंबई३१ डिसेंबर पूर्वी आयकर न भरल्यास होणार एवढा दंड!

३१ डिसेंबर पूर्वी आयकर न भरल्यास होणार एवढा दंड!

Subscribe

या मुदतीनंतर आयकर रिटर्न सादर केला तर करदात्यांना दुप्पट दंडाला सामोरे जावे लागेल.

करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी. जर तुम्ही अद्याप आयकर (ITR) भरला नसेल तर तुम्ही तो ३१ डिसेंबर पूर्वी भरुन टाका. असे न केल्यास तुम्हाला दंडात्मक शिक्षा होऊ शकते. विलंब शुल्कासह आयकर रिटर्न भरण्यासाठी ३१ डिसेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. पण या मुदतीनंतर आयकर रिटर्न सादर केला तर करदात्यांना दुप्पट दंडाला सामोरे जावे लागेल. त्यानुसार करदात्याला १० हजार रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागू शकतो.

यापूर्वी एक महिन्याची वाढीव मुदत

वैयक्तिक करदात्यांना आयकर विभागाने यापूर्वी ३१ जुलैपर्यंत रिटर्न फायलिंगची मुदत दिली होती. पण करदात्यांना कंपन्यांकडून फॉर्म १६ मिळण्यात झालेला उशीर, तांत्रिक अडचणी यामुळे रिटर्न फायलिंगला एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली. त्यानुसार ३१ ऑगस्टपर्यंत वैयक्तिक करदात्यांना रिटर्न फायलिंगसाठी वेळ देण्यात आला होता. पण आता वाढीव अंतिम मुदत सुद्धा संपुष्टात आल्याने करदात्यांना आता रिटर्न फायलींग करताना पाच हजारांचा दंड भरावा लागणार आहे.

- Advertisement -

यांना दंड भरावा लागणार नाही

आयकर अधिनियम १९६१ च्या ‘कलम २३४ एफ’ नुसार ही कारवाई करण्यात येणार आहे. त्यानुसार ३१ डिसेंबरपर्यंत रिटर्न फाईल करणाऱ्या करदात्याला पाच हजारांचा दंड आणि त्यानंतर रिटर्न फाईल करणाऱ्या करदात्यांना १० हजारांचा दंड भरावा लागणार आहे. यामध्ये ५ लाखा रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या करदात्यांना विलंब शुल्क म्हणून एक हजारांचा दंड भरावा लागणार आहे. याशिवाय ज्या करदात्यांचे वार्षिक उत्पन्न कर वजावटीचा लाभ घेतल्यानंतर करमुक्त असेल तर त्यांना रिटर्न फायलिंग करता दंड भरावा लागणार नाही.

वैयक्तिक करदात्यांची करमुक्त उत्पन्नाची मर्यादा 

श्रेणी करमुक्त उत्पन्न मर्यादा
६० वर्षांखाली करदाते २.५० लाख
६० ते ८० वर्ष (ज्येष्ठ नागरिक) ३ लाख
८० वर्षांवरील (अति ज्येष्ठ) ५ लाख

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -