घरक्राइमपायल घोष वि. अनुराग कश्यप वादात आता रामदास आठवलेंची उडी!

पायल घोष वि. अनुराग कश्यप वादात आता रामदास आठवलेंची उडी!

Subscribe

अभिनेत्री पायल घोषनं दिग्दर्शक अनुराग कश्यपवर आपल्यावर अत्याचार केल्याचे आरोप केले आहेत. यासंदर्भात पायल घोषनं (Payal Ghosh) मुंबई पोलिसात तक्रार देखील दाखल केली. मात्र, त्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्यामुळे आज केंद्रीय मंत्री आणि रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athavle) यांनी पायल घोषची भेट घेतली. या भेटीनंतर या दोघांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये रामदास आठवलेंनी पायल घोषची बाजू मांडताना मुंबई पोलिसांच्या तपासाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तसेच, पायल घोष प्रकरणात आता मी स्वत: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहून या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती करणार असल्याचं यावेळी बोलताना रामदास आठवले यांनी सांगितलं.

काय म्हणाले रामदास आठवले?

अनुराग कश्यपविरोधात लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी रामदास आठवले यांनी केली आहे. ‘पायलच्या प्रकरणात अद्याप अनुराग कश्यपला (Anurag Kashyap) चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं नाही. पोलिसांच्या चौकशीवर आमचा विश्वास आहे. पण हे सगळं सुरू असताना पोलिसांच्या चौकशीवर किती विश्वास ठेवायचा? असा प्रश्न माझ्या मनात निर्माण होत आहे. आरोपी अत्याचार करून मोकळे फिरतात तरी पोलीस त्याला पकडत नाहीत. अनुराग कश्यप मुंबईतच आहे. तरी पोलीस (Mumbai Police) त्याला पकडत नाहीत. यासाठी मी अनिल देशमुखांनाही पत्र लिहिणार आहे. अमित शहांना देखील मी पत्र लिहिणार आहे’, असं रामदास आठवले यावेळी म्हणाले.

- Advertisement -

काय आहे पायल घोष प्रकरण?

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यावर अभिनेत्री पायल घोष हिने गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. पायलने ट्विट करत अनुरागवर हे आरोप केले असून सोबतच एका मुलाखतीचा व्हिडिओदेखील शेअर केला आहे. तसेच तिने याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणीही केली आहे. अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केलं असून मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली आहे. कृपया या व्यक्तीविरोधात काही तरी कारवाई करा, ज्यामुळे या माणसाचं खरं रुप समोर येईल. मला माहित आहे यामुळे मला धोका असून माझ्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कृपया माझी मदत करा, असे पायलने ट्विट करत म्हटले होते.


हेही वाचा – ‘जर मी छताला लटकलेले दिसले तर ती आत्महत्या नसेल’, पायलचं धक्कादायक ट्विट!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -