घरCORONA UPDATECorona: वांद्रे-कुर्ला भाजी मार्केटमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड

Corona: वांद्रे-कुर्ला भाजी मार्केटमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड

Subscribe

वांद्रे-कुर्ला परिसरातील भाजी मार्केटमध्ये भाजी खरेसाठी लोकांनी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.

देशात लॉकडाऊन सुरू असताना लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळणे गरजेचे आहे. मात्र असे होताना काही दिसत नाही. ठिकठिकाणी लोकं वेगवेगळ्या कारणांसाठी एकत्र येऊन गर्दी करत आहेत. प्रामुख्याने भाजी घेण्यासाठी मोठ्या संख्येने ग्राहक एकत्र जमत असल्याचे चित्र अनेकदा पाहायला मिळाले आहे. आज सकाळीदेखील वांद्रे-कुर्ला परिसरातील भाजी मार्केटमध्ये भाजी खरेसाठी लोकांनी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. देशासह राज्यात आणि प्रामुख्याने मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून लोकांनी असे नियमभंग करणे घातक ठरू शकते. मात्र अजूनही नागरीक जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला घेण्यासाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहेत.

- Advertisement -

भारतात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. देशव्यापी लॉकडाऊनचा आज १३ वा दिवस आहे. केंद्र आणि राज्य सरकारने अनेक प्रयत्न करुनही रुग्णांची संख्या काही केल्या कमी होत नसून ती वाढत चालली आहे. देशभरातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा वाढला असून तो आता ३५७८ च्या पुढे पोहोचला आहे. तर राज्यात काल ११३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ७४८ झाली आहे. राज्यात १३ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूपैकी ८ जण मुंबईतील, ३ जण पुण्याचे तर प्रत्येकी १ रुग्ण कल्याण डोंबिवली आणि औरंगाबाद येथील आहे.

हेही वाचा –

Coronavirus: अमेरिकेत वाघाला कोरोनाची लागण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -