घरमुंबईसंस्कृतमुळे मेंदूचा विकास झपाट्याने होतो!

संस्कृतमुळे मेंदूचा विकास झपाट्याने होतो!

Subscribe

इटलीच्या ट्रेंटो विद्यापीठाने संस्कृत भाषेसंबंधी केलेल्या संशोधनातून भारताला अभिमान वाटेल असा निष्कर्ष समोर आला आहे. संस्कृतमुळे मेंदूचा विकास जलदगतीने होतो. अशी माहिती या संशोधकांनी दिली आहे.

आपल्या देशाची ओळख असलेल्या संस्कृत भाषेचे महत्त्व इटलीतील एका विद्यापीठाने संशोधनासतून सिद्ध केले आहे. इटलीच्या ट्रेंटो विद्यापीठातील इंडिया-ट्रेंटो पार्टनरशिप फॉर अॅडव्हान्स रिसर्च (आयटीपीएआर) या विभागाने नुकतेच दिल्ली विभागातील अनेक सरकारमान्य शाळांमधून व्यावसायिक वैदिक पंडितांची नियुक्ती करून त्यांच्या मेंदूचा अभ्यास भारताच्या नॅशनल ब्रेन रीसर्च सेंटरमध्ये स्ट्रक्चरल मॅगनेटिक रेझोनान्स इमेजिंग (एमआरआय) माध्यमातून केला. यामध्ये पंडितांचे मेंदू, वय, लिंग, डोकं, वर्चस्व आणि बहुभाषिकतेशी जुळणारे नियंत्रण स्कॅन करण्यात आले. या संशोधनातून संस्कृत पठण करणाऱ्यांच्या मेंदूचा विकास झपाट्याने होतो, असे सिद्ध झाले आहे.

परदेशी नागरिकांनाही संस्कृतची गोडी

संस्कृत ही भारतातील सर्वात जुनी भाषा आहे. या भाषेपासून वेगवेगळ्या भाषांचा उगम झाला आहे. मंत्र पठण करणे, एका सुरात सुभाषितं बोलणे यासाठी खूप एकाग्रता लागते. मात्र शाळेपासूनच संस्कृत भाषेची ओळख असल्यामुळे ही आत्मसात करणे जास्त सोपे होते. परदेशातही या भाषेला खूप महत्व आहे. अनेक परदेशी नागरिकांना संस्कृत भाषेचा अभिमान आहे. ही भाषा शिकण्यासाठी अनेक परदेशी नागरिक भारतात येतात. मात्र संस्कृत भाषा शाळा-कॉलेजमध्ये सक्तीची करण्याबाबत विद्यार्थ्यांची मतं धक्कादायक आहेत. अशाने ही हळूहळू लोप पावण्याची भीती संस्कृत अभ्यासकांना वाटते.

विद्यार्थ्यांना आधीच एवढा अभ्यासाचा ताण असतो. महत्वाचे म्हणजे त्यांना दिल्या जाणाऱ्या प्रोजेक्ट्समध्ये ही नवीन अडचण कशाला? विद्यार्थ्यांना या विषयाची आवड असेल तर ठिक, अन्यथा उगाच ताण नको. हा विषय सक्तीचा केल्यास इतक्या महागाईत तो शिकण्यासाठी वेगळी ट्युशन लावणं परवडणारं नाही.
– मनाली गमरे, पालक, माझगांव

शाळेतील मुलांचे हे खेळायचे दिवस आहेत. त्यात संस्कृत भाषा विषयाची सक्ती नको. आधीच मुलांचा शाळा आणि क्लास यातच सगळा वेळ जातो. त्यात इतर वेगळे क्लाससुद्धा असतात. कधी कधी तर असं वाटतं की मोबाइलच्या युगात त्यांचे बालपण कुठेतरी हरवल आहे.
– अनुष्का जाधव, पालक, माझगांव

बोर्डाच्या अभ्यासक्रमाचा ताण त्यात घरच्याची अपेक्षा याने विद्यार्थी मेटाकुटीला येतात. त्यात हे नवीन ओझं कशाला? आहे तिच शिक्षण व्यवस्था सुधारून द्या. त्यात नवीन भर नको.
– मृदुला कदम , विद्यार्थी

- Advertisement -

भारताला विविध कला, परंपरेचा वारसा लाभलेला आहे. यापैकीच एक म्हणजे ‘संस्कृत भाषा’. प्राचीन काळापासून अगदी २१ व्या शतकापर्यंत संस्कृत भाषेला देशात महत्त्वाचे स्थान आहे. शालेय जीवनात अभ्यासक्रमांमध्ये समावेश करण्यात आलेल्या या भाषेला अनन्य साधारण महत्त्व आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ही परंपरा लोप पावत चालली असल्याची भावना संस्कृत भाषा अभ्यासक व्यक्त करत आहेत. शाळांमध्ये १०० मार्कांचा संस्कृत भाषा विषय हा आता पर्यायी विषय बनून राहिला आहे.

संस्कृत या भाषेमुळे मुलांची वाणी आणि उच्चार शुद्ध होतात. संस्कृतला अन्य भाषांची जननी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपले श्लोक, मंत्रोच्चारही याच भाषेत आहेत. महत्वाचे म्हणजे आजच्या तरुण पीढिला आपल्या संस्कृत भाषेचा अभिमान असायला हवा.
– वैशाली तिगडी, शिक्षिका, डायमंड ज्युबली स्कूल

संस्कृत भाषेचा इतिहास

संस्कृत ऊर्फ गीर्वाणवाणी ही एक ऐतिहासिक भाषा असून ती पृथ्वीवरील सर्वात प्राचीन, समृद्ध, अभिजात आणि शास्त्रीय भाषा मानली जाते. ही भाषा हिंदू, बौद्ध, शीख आणि जैन धर्मांच्या उपासनेची भाषा असून ती भारताच्या २३ शासकीय राज्यभाषांपैकी एक आहे. नेपाळमध्येही या भाषेला अतिशय महत्त्व आहे. या भाषेत अनेक सुभाषिते आहेत. विख्यात व्याकरणतज्‍ज्ञ पाणिनीने इ.स. पूर्व काळात ‘अष्टाध्यायी’ या ग्रंथाद्वारा संस्कृत भाषेला प्रमाणित केले. संस्कृत भाषेतील अनेक शब्द भारतीय भाषांमध्ये जसेच्या तसे योजले जातात. संस्कृतमधूनच उत्तर भारतीय भाषा जन्मल्या आहेत. या भाषेला सुरभारती, देववाणी, देवीवाक्‌, देवभाषा, अमरभारती अशी अनेक नावं आहेत. संस्कृतमध्ये लिहिलेले वेदवाङ्‌मय हे सर्वात प्राचीन वाङ्‌मय आहे. असे असले तरी कवी वाल्मीकी हे संस्कृत भाषेचे आद्यकवी होत. त्यांनी रामायण हे महाकाव्य लिहिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -