घरमुंबईमुंबईतील कचरा नक्की कोणत्या करवले गावात डम्प होणार?

मुंबईतील कचरा नक्की कोणत्या करवले गावात डम्प होणार?

Subscribe

बृहन्मुंबई महानगरपालिकेने घनकचरा प्रकल्पासाठी करवले गावाची निवड केली आहे. मात्र, हे करवले गाव नक्की कुठले करवले गाव आहे? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

ठाणे जिल्ह्याच्या अंबरनाथ तालुक्यातील करवले गावात होणार असलेल्या डम्पिंग ग्राऊंड प्रकल्पाच्या प्रश्नाबाबत नव्या वादाला तोंड फुटले आहे. कारण मुंबईत होणारा कचरा ठाणे जिल्ह्यातील करवले गावी होणाऱ्या डंपिंग ग्राऊंडवर जाणार कि अजून दुसऱ्या करवले गावात, असा प्रश्न निर्माण झाला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने घनकचरा प्रकल्पासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अखत्यारीतील तळोजा येथील करवले गावाची जागा महाराष्ट्र शासनाकडे मागितली होती. मात्र मुंबई महापालिकेने तळोजा येथील करवले गाव सोडून हा प्रकल्प ठाणे जिल्ह्यातील मलंगगड येथील करवले गावात आणल्याचे तेथील ग्रामस्थ रामदास म्हात्रे सांगत आहेत. प्रशासकीय कामकाजात डोळेझाक होत असून त्याचा भुर्दंड आम्हास का? असा रोखठोक सवाल डोंबिवलीतील म्हात्रे विचारात आहेत.

दोन्ही करवले गावात ८ किलोमीटरचे अंतर

डोंबिवलीत राहणारे रामदास म्हात्रे यांचे गाव करवले असून घनकचरा प्रकल्पामध्ये त्यांची जमीन जाणार आहे. या प्रकरणाची माहिती मिळवण्यासाठी याबाबतचे कोर्टात दाखल केलेले प्रतिज्ञापत्र माहिती अधिकारात मागविले होते. त्यानुसार त्यांना उपसचिव गोखले यांनी केलेला पत्रव्यवहारची माहिती मिळाली. यामध्ये तळोजा येथील करवले गावात बृहन्मुंबई महानगरपालिकेने घनकचरा प्रकल्प राबवला जाणार असल्याचे म्हटले आहे. मात्र तस न होता जागा अंबरनाथ तालुक्यातील करवले गावची निवड केली. याबाबत रामदास म्हात्रे यांनी सांगितले की, तळोजाजवळ एक करवले गाव आहे आणि एक मलंगगड येथे करवले गाव आहे. या दोन्ही गावात ८ किलोमीटरचे अंतर आहे. त्यामुळे या प्रकल्पात अधिकाऱ्यांनी यात घोळ केलेला आहे. अधिकाऱ्यांनी न्यायालयाची आणि शेतकऱ्यांची देखील दिशाभूल केल्याचा आरोप रामदास म्हात्रे यांनी केला आहे. या संबंधी न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आता मुंबईचा कचरा टाकण्यासाठी निवडलेले करवले गाव नक्की कोणते याचे ऊत्तर मिळेल का असा प्रश्न म्हात्रे विचारात आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – घ्या! समुद्राचं मुंबईकरांना रिटर्न गिफ्ट, १९५ टन कचरा फेकला बाहेर!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -