घरमुंबईएटीएम सेंटरबाबत कायमची उपाययोजना करा

एटीएम सेंटरबाबत कायमची उपाययोजना करा

Subscribe

वारंवार बंद पडणार्‍या एटीएम सेंटरबाबत कायमची उपाययोजना करावी, अशा सूचना संसदीय समितीने आरबीआयला केली आहे. बँकांनी पुरेशा प्रमाणात एटीएम चालू ठेवावीत, अशी सूचना अर्थ विषयावरील स्थायी समितीने आरबीआयला केली. जगाच्या तुलनेत देशात डिजिटल व्यवहारांचे प्रमाण झालेले नाही. त्यामुळे एटीएम ही पुरेशा प्रमाणात असावीत, असे संसदीय समितीने म्हटले आहे.

ग्रामीण आणि निम्न शहरात अनेक एटीएम बंद होत आहेत. वाढत्या अर्थव्यवस्थेत रोकडची मागणी वाढत असताना सध्याचे एटीएम पुरेसे नसल्याची चिंता संसदीय समितीने व्यक्त केली. बँका बंद असताना तसेच बँक कर्मचार्‍यांच्या संप काळातही ग्राहकांची एटीएम सेवेवर मुख्य भिस्त असते.

- Advertisement -

अनेकदा एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेल्यानंतर एटीएम सेवा बंद असल्याचा आपल्याला अनुभव येतो. यामुळे पुरेशी रोकड वेळेवर उपलब्ध होत नसल्याने अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागते. अशा सतत बंद पडणार्‍या एटीएम केंद्राबाबत उपाययोजना कराव्यात, अशी सूचना संसदीय समितीने आरबीआयला केली आहे. या समितीचे प्रमुख काँग्रेसचे वरिष्ठ नेते एम. वीरप्पा मोईली आहेत. नोटांबदीनंतर आरबीआयने रोकड पुरवठा करण्यासाठी केलेल्या उपाययोजना पुरेशा नसल्याचे समितीने म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -