घरमुंबईरेल्वे प्रवासात व्हीआयपी कोटा मिळवून देण्यासाठी 'तो' वापरायचा आमदार,खासदारांची बनावट शिफारसपत्रं..

रेल्वे प्रवासात व्हीआयपी कोटा मिळवून देण्यासाठी ‘तो’ वापरायचा आमदार,खासदारांची बनावट शिफारसपत्रं..

Subscribe

सीएसटी पोलिसांची कारवाई, आरोपीला लखनऊमध्ये ठोकल्या बेड्या..

काय आहे नेमकं प्रकरण.-

- Advertisement -

रेल्वे प्रवासात व्हीआयपी कोटा मिळवून देण्यासाठी इंटरनेटचा आधार घेऊन आमदार खासदारांची बनावट शिफारसपत्रं दाखवून त्यातून पैसे उकळणाऱ्या इसमाला मुंबईच्या सीएसटी रेल्वे पोलिसांनी लखनऊमध्ये अटक केली. आरोपी मूळचा लखनऊचा रहिवासी असून गेल्या दोन वर्षापासून तो हे काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. देवप्रताप चतुर्भुज सिंग असं या आरोपीचे नाव असून तो महाराष्ट्र,उत्तरप्रदेश आणि देशातल्या इतर बऱ्याच राज्यांमधून हा गैरकारभार करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्यातले गृह विभागातील के.पी.बक्षी यांच्या नावानेसुद्धा बनावट शिफारस पत्र देऊन त्याने रेल्वे व्हीआयपी तिकीट मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांना संशय आल्याने त्यांनी या प्रकरणाची कसून चौकशी केली आणि तब्बल आठ दिवसांच्या तपासानंतर आरोपीला लखनऊमध्ये बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले. आरोपीचे वडील तेथील स्थानिक आमदाराच्या कार्यालयात जनसंपर्क प्रमुख म्हणून काम करतात त्यामुळेच आरोपीला ही कल्पना सुचली असं चौकशीदरम्यान सिद्ध झाल्याचे पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं.

- Advertisement -

काय करायचा आरोपी ?

आरोपी आमदार आणि खासदारांची इंटरनेटवरून पत्रे डाउनलोड करून त्यातला मजकूर बदलत असे आणि त्यामध्ये रेल्वे प्रवासाचे व्हीआयपी तिकीट मिळवून देण्यासाठी मजकूर बदलून ते रेल्वे कार्यालयात पाठवत असे. पण यादरम्यान हे पत्रं पाठवण्यासाठी लागणारा फॅक्स नंबर हा त्या आमदार किंवा खासदारांच्या कार्यालयाचा असेल याची खबरदारी घेत असल्याने आतापर्यंत तो यशस्वी झाला असल्याचे पोलिसांनी सांगितलं.

दोन वर्षांपासून आरोपीने चालवलेल्या या सत्रात आतापर्यंत जवळपास 11 आमदार उच्चपदस्थ लोकांच्या शिफारसपत्रांचा वापर केला असल्याचे आरोपीने कबूल केले आहे.प्रत्येक तिकिटामागे 1200 ते 2400 रुपये त्याला मिळत होते असे त्याने कबुल केले आहे.आतापर्यंत वापरण्यात आलेल्या बनावट शिफारसपत्रांमध्ये बहुतांश लोक हे आमदार ,खासदार आणि उच्चपदस्थ असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.

अशी केली पोलिसांनी कारवाई-

के.पी. बक्षी यांच्या शिफारस पत्रावरून संशय बळवल्याने पोलिसांनी कसून तपास सुरू केला आणि अखेर 8 दिवसांच्या तपासानंतर एका टिमसह रेल्वे पोलिसांचे पथक लखनऊ मध्ये दाखल झाले आणि आरोपीला बेड्या ठोकल्या. मंत्र्यांच्या पत्रांचा गैरवापर करून व्हीआयपी कोटा मिळवून देण्याचा या प्रकरणाला आळा घातला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -