घरमुंबईश्वानाने घाण केल्यास मालकांना आकारणार दंड

श्वानाने घाण केल्यास मालकांना आकारणार दंड

Subscribe

सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांनी घाण केल्यास त्यांच्या मालकांना आता चांगलाच चाप बसणार आहे. रस्ते किंवा पदपथ या ठिकाणी अस्वच्छता केल्यास ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

सार्वजनिक ठिकाणी, रस्ते आणि पदपथांवर श्वानाने घाण केल्यास प्राण्यांच्या मालकांना महापालिकेकडून दंड आकारण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी घाण करुन नये याबाबत महापालिकेकडून जनजागृती करण्याचा निर्णय देखील महापालिकेने घेतला आहे. मात्र तरी देखील जर पाळीव प्राण्यांने रस्ते, पदपथावर घाण केल्यास त्यांच्या मालकांना येत्या १० डिसेंबर पासून ५०० रुपयाचा दंड आकारण्यात येणार असल्याचे आदेश पालिका आयुक्त अयोज मेहता यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत.

या ठिकाणी घाण केल्यास आकारणार दंड

मुंबईत मोठ्या प्रमाणात पाळीव प्राणी पाळले जातात. पाळीव प्राण्यांना मालक निरनिराळ्या ठिकाणी दररोज सकाळ, संध्याकाळ फेरफटका करण्यासाठी समुद्रकिनारे, उद्याने, मैदाने अशा सार्वजनिक ठिकाणी घेऊन जातात. मात्र अनेकदा हे पाळीव प्राणी सार्वजनिक ठिकाणी मल-मूत्र करतात. यामुळे सार्वजनिक ठिकाणे, रस्ते आणि पदपथ अस्वच्छ होतात. त्यामुळे पालिकेने यावर गंभीर दखल घेतली असून आता यावर धडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कुत्र्यांना फेरफटका मारण्यासाठी घेऊन जाताना त्यांच्या मालकांनी सोबत ‘पूप स्कूपर’ सोबत ठेवणे गरजेच आहे आणि ते नसल्यास कुत्र्यांच्या मालकांना ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

- Advertisement -

जनजागृती करण्यात येणार

पाळीव श्वानांच्या मालकांमध्ये पुढील आठवडाभर याबाबत जनजागृती करण्याची सूचना अजोय मेहता यांनी पालिका अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. स्वच्छतेबाबत आठ दिवस जनजागृती केली आणि तरी देखील परिस्थिती सुधारली नाही तर कुत्र्यांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. असे स्पष्ट आदेश मेहता यांनी विभाग कार्यालयांमधील सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.


वाचा – अभिनेत्री निया शर्माला कुत्रा चावला

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -