दिवाळीच्या मुहूर्तावर मुंबईत पेट्रोल-डिझेल स्वस्त

आंतराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घट होत असल्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर स्वस्त होत आहेत.

Mumbai
Today's Petrol & diesel prices in Mumbai and delhi
पेट्रोल, डिझेलचा दर वाढला

दिवाळीच्या मुहूर्तावार सर्वसामान्य लोकांना खुशखबर मिळाली आहे. सोमवारी (आज) पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलचे भाव घसरले आहेत. मुंबईमध्ये आज पेट्रोल २२ पैशांनी स्वस्त झाले असून, पेट्रोलचा आजचा भाव ८४.०६ रुपये प्रतिलीटर इतका आहे. तर डिझेल २१ पैशांनी स्वस्त झाले असून, मुंबईत आजचा डिझेलचा भाव ७६.७६ रुपये प्रतिलीटर आहे. रविवारी मुंबईमध्ये पेट्रोल २१ पैशांनी घटलं होतं, तर डिझेल १८ पैशांनी स्वस्त झालं होतं. गेल्या काही दिवसात इंधनाच्या दरात सातत्याने होत असलेली घट सर्वसामान्यांना दिलासादायक ठरते आहे. ऐन दिवाळीच्या काळात इंधनाचे दर घटल्यामुळे देशातील जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे. आंतराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घट होत असल्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर स्वस्त होत आहेत.

 


दिल्लीतील आजचे दर

राजधानी दिल्लीतही आज पेट्रोल-डिझेझल्या दरात घसरण झाली आहे. आज दिल्लीमध्ये पेट्रोल २२ पैशांनी स्वस्त झाले असून, पेट्रोल ६८.५६ पैसे प्रतिलीटर दराने उपलब्ध आहे. तर, डिझेल २० पैशांनी स्वस्त झाले असून आज दिल्लीमध्ये डिझेल ७३.१६ रुपये प्रतिलीटर दराने उपलब्ध आहे. एकंदरच मध्यंतरीच्या काळाच इंधन दरवाढीमुळे हैराण झालेले लोक आता सुखावले असल्याचे चित्र दिसत आहे.


पाहा फिचर्स: ‘फोल्ड’ होणारा भन्नाट स्मार्टफोन

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here