घरCORONA UPDATEचंद्रकांत हंडोरे यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची गर्दी; सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा

चंद्रकांत हंडोरे यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची गर्दी; सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा

Subscribe

मुंबईमध्ये कोरोनाने गुणाकार करायला सुरूवात केली असतानाच काही ठिकाणी मात्र सोशस डिस्टन्सिंगचा फज्जा उडताना पाहायला मिळत आहे. कोरोनावर मात करून घरी आलेल्या काँग्रेसचे नेते, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या स्वागत कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. चेंबूर मधील काँग्रेसचे नेते माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर नवी मुंबई येथील रुगणलायत गेलेल २० दिवस अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. तीन चाचण्या पॉझिटिव्ह आल्यानंतर काल चौथी चाचणी निगेटिव्ह आली त्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

हेही वाचा – तेव्हा सरकार तरले… आता कसे पडेल? ‘सामना’ तून फडणवीसांना सवाल

- Advertisement -

कोरोनावर केली मात 

चंद्रकांत हंडोरे यांच्या चेंबूरमधील पी. एल. लोखंडे मार्गावर असलेल्या त्यांच्या घरी परतल्यावर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, स्पीकर लावून जंगी स्वागत केले. दरम्यान अनेकांनी तोंडाला मास्क लावले नसल्याचेही पाहालया मिळाले. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून चेंबुरच्या जनतेला मदत करण्यासाठी चंद्रकांत हंडोरे विभागात फिरत होते आणि त्यात त्यांना कोरोनाची लागण झाली. परंतु काल रात्री साजरा झालेला हा जल्लोष मात्र त्यांचाच विभागाला कोरोनाच्या संकटात ढकलणारा ठरू शकतो.

मुंबईत कोरोना रुग्णांमध्ये वाढ 

मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शनिवारी ५४ कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती पालिका आरोग्य विभागकडून देण्यात आली. याशिवाय कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील तीन दिवसांपासून पुन्हा वाढ झाल्याचे दिसून येत आहे. शनिवारी मुंबईमध्ये १५१० नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ३८ हजार २२० वर पोहोचली. त्याचप्रमाणे ५४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १२२७ वर पोहोचला आहे. मृत्यू झालेल्या ५४ पैकी १४ मृत्यू हे २५ ते २८ मे दम्यानचे आहेत. तर मृत रुग्णांपैकी ३९ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये ३१ पुरुष तर २३ महिलांचा समावेश आहे. २८ जण हे ६० वर्षांवरील, तर २६ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते, अशी माहिती पालिका साथ रोग कक्षाकडून देण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -