घरमुंबईमृत पायलट मारियाच्या पतीचे यु वाय कंपनीवर गंभीर आरोप

मृत पायलट मारियाच्या पतीचे यु वाय कंपनीवर गंभीर आरोप

Subscribe

विमान दुर्घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झालेल्या पायलट मारियाचे पती प्रभात कथुरिया यांनी कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. यु वाय एव्हीएशन कंपनीने जबरदस्ती उड्डान करायला लावले असल्याचा आरोप त्यांनी केलाय.

विमान दुर्घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झालेल्या पायलट मारियाचे पती प्रभात कथुरिया यांनी कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. उड्डानापूर्वी मारियाचा फोनवरुन पतीशी संवाद झाला होता. यु वाय एव्हीएशन कंपनीने जबरदस्ती उड्डान करायला लावले असल्याचा आरोप त्यांनी केलाय. हवामान खराब असताना देखील कंपनीने विमानाचे उड्डान करण्याचे आदेश दिले. विमानाची चाचणी होणार नाही असं मारियाने फोनवरुन सांगितले होते. चाचणी न झाल्याने मारियाने टेक ऑफसाठी विरोध देखील केला होता. तरी देखील जबरदस्तीने विमानाचे उड्डान करण्यात आले. मारियाच्या सूचनेकडे दुर्लक्ष करुन उड्डान करण्यात आल्याचा आरोप मारीयाचे पती प्रभात यांनी केला आहे.

कंपनीकडून कसलाही प्रतिसाद नाही

सध्या कंपनीतून काहीही प्रतिसाद मिळालेला नाही. अशी प्रतिक्रिया अॅड. प्रभात कथुरिया यांनी दिली आहे. १ वाजता मारियाला मॅसेज केला होता. पण तिने २ तास मॅसेजचा रिप्लाय दिला नाही. एक ड्राईव्ह जवळपास १ तास ४५ मिनिटाचे असते. मारिया यांना १ हजार तास विमान उड्डाणाचा अनुभव आहे. दरम्यान मारिया यांच्यासंदर्भात कंपनीकडून कोणतिही माहिती सांगण्यात आली नसल्याचे त्यांच्या पतीने सांगितले आहे. मारिया यांना १५ वर्षाची मुलगी आहे.

- Advertisement -

मारिया यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

विमानाच्या पायलट मारिया यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. विमानात असणाऱ्या सर्व जणांनि अनेकांचे प्राण वाचवण्यासाठी स्वत:चा जीव गमावला. विमान बांधकाम सुरु असलेल्या इमारतीजवळ पडल्याने मोठा अनर्थ टळला. गजबजलेल्या भागात जर विमान कोसळले असते तर मोठी जीवितहानी झाली असती.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळावर दिली भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या दुर्घटनेची योग्य चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिली. ‘ही अत्यंत दुर्देवी घटना आहे. सुदैवाने हे विमान बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी पडल्याने आजुबाजूच्या इमारतींमधील सहिवासी सुखरुप आहे. याप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल’, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. याप्रकरणी उड्डाण मंत्रालयाने डीजीसीएला चौकशीचे आदेश दिले आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -