घरमुंबईओल्या कचर्‍यापासून खतनिर्मितीसाठी मंडई, उद्यानात जागा

ओल्या कचर्‍यापासून खतनिर्मितीसाठी मंडई, उद्यानात जागा

Subscribe

मुंबईतील अनेक गृहनिर्माण संस्थांमध्ये जर १०० किलोपेक्षा अधिक जागा उपलब्ध होत असेल आणि त्या संकुलांमध्ये ओल्या कचर्‍यावर प्रक्रीया करून खतनिर्मिती प्रकल्प राबवणे शक्य नसेल तर अशा संस्थांना मंडई, उद्यानातील मोकळी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. अशा संस्थांना आयुक्तांच्या मान्यतेने कचरा वाहून उद्यानात खतनिर्मतीसाठी जागा दिली जाणार आहे.

महापालिका आयुक्तांच्या १८ जुलै २०१७ च्या परिपत्रकानुसार मोठ्या प्रमाणात कचरा म्हणजे १०० किलो पेक्षा जास्त कचरा निर्मिती करणार्‍या शासकीय तसेच निमशासकीय कार्यालये, व्यापारी संस्था, शैक्षणिक संस्था, रुग्णालये, हॉटेल इत्यादींना त्याच ठिकाणी कचर्‍याचे वर्गीकरण करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार कार्यवाही सुरु असून आतापर्यंत १६९८ संस्थांकडून ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया करून त्यांची विल्हेवाट लावली जाते. तर सुका कचरा परस्पर भंगारवाल्यास विकला जातो किंवा महापालिकेच्या सुका कचरा संकलन केंद्रांना दिला जातो.

- Advertisement -

खासगी गृहनिर्माण संस्थांमधील दररोज निर्माण होणार्‍या घनकचर्‍यावर प्रक्रिया गांडुळ खत खड्डा करण्यासाठी विकास आराखड्यामध्ये निश्चित जागा आरक्षित करण्यासाठी २००७ पासून आय.ओ.डीमध्ये तशा प्रकारची अट अंतर्भूत आहे. तथापि तत्पूर्वीच्या काही गृहनिर्माण सोसायट्यांकडे जर जागेचा अभाव असेल तर, एका गृहनिर्माण सोसायट्याकडे १००किलोपेक्षा कचरानिर्माण होत असेल, व सेवाभावी संस्था तेथील ओला कचरा वेगळा करून खत निर्मितीसाठी इच्छुक असेल तर त्याकरता अशा सोसायट्यांच्या ओल्या कचर्‍यासाठी मंडई, उद्याने आदी ठिकाणी वाहून नेत तेथे खत निर्मितीबाबतचा प्रस्ताव आचयुक्तांच्या आदेशांकरता सादर करण्यात येईल,असे घनकचरा विभागाने स्पष्ट केले.ओल्या कचर्‍यापासून खतनिर्मिती करण्यासाठी इच्छुक असलेल्या सेवाभावी संस्थांना महापालिकेची खेळाची मैदाने व उद्याने यामध्ये जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक हरिष छेडा यांनी ठरावाच्या सूचनाद्वारे केली होती. या सूचनेवर अभिप्राय देताना प्रशासनाने हे स्पष्ट केले आहे.

खतपेट्याचांही पुरवठा

मुंबई महापालिकेच्या सर्व २४ विभागांसाठी दैनंदिन कचर्‍याचे वर्गीकरण करून तो गोळा करण्यासाठी गृहनिर्माण संस्थांना १२०ते २४० लिटर क्षमतेचे एच.डी.पी.ई कचरा पेट्या या नगरसेवक निधीतून महापालिकेकडून पुरवले जातात. त्याच धर्तीवर ओल्या कचर्‍यापासून आवारात खत निर्मिती प्रकल्प राबवण्याकरता खतनिर्मिती पेट्या महापालिकेच्यावतीने पुरवण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्पष्ट केले आहे. भाजपच्या नगरसेविका नेहल शाह यांनी याबाबतची मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. शाह यांची ही सूचना स्वागतार्ह असून ती विचाराधीन असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -