घरमुंबईरक्तदानासोबत प्लेटलेट्स दानासाठी जनजागृती देखावा

रक्तदानासोबत प्लेटलेट्स दानासाठी जनजागृती देखावा

Subscribe

रक्तदानासोबत रक्तात असणाऱ्या घटकांची मोठ्या प्रमाणात मागणी असते. तसेच रक्त घटकांपैकी सर्वात जास्त प्लेटलेट्सची गरज पडते. त्यामुळे रक्तदानासोबत प्लेटलेट्स देखील दान करा असे आवाहन बाप्पाने केले आहे.

आपल्याला नेत्रदान, अवयवदान, देहदान आणि रक्तदान याबद्दल माहिती असेल. पण, रक्तदानासोबतच रक्तात असणाऱ्या घटकांची मोठ्या प्रमाणात मागणी असते. रक्त घटकांपैकी सर्वात जास्त प्लेटलेट्सची गरज पडते. पण, याबाबत जनजागृती होणं गरजेचं असून ज्या रुग्णांना हे घटक तात्काळ उपलब्ध होणं आवश्यक असतं. याच पार्श्वभूमीवर रक्तदात्यांनी रक्तदानासोबत प्लेटलेट्स ही दान करावं यासाठी कांजूरमार्ग पूर्वेच्या दातार कॉलनीतील फ्रेंन्ड्स सर्कल मित्र मंडळाने आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या सहयोगाने प्लेटलेट्स दानाचा देखावा सादर केला आहे.

फ्रेंन्ड्स सर्कल मित्र मंडळाकडून प्लेटलेटदानासाठी आवाहन

कॅन्सरपिडीत रुग्णांच्या रक्तातील प्लेटलेट्स मोठ्या प्रमाणात कमी होतात. शिवाय, काही कालांतराने मृत पावतात. त्यांना वारंवार प्लेटलेट्सची गरज पडते. अनेकदा रक्त आणि रक्तघटक अशा रुग्णांना उपलब्ध होत नाहीत. परिणामी उपचारांमध्ये उशीर होऊन रुग्णाला जीव गमवावा लागतो. ही परिस्थिती बदलता येऊ शकते, पण त्यासाठी जास्तीत जास्त रक्तदानासोबत प्लेटलेट्सचंही दान करणं गरजेचं आहे.

- Advertisement -

कॅन्सरपीडीत रुग्णांना या प्लेटलेटची किती आवश्यकता असते? अशा विषयावर आधारित जिवंत देखावा साकारून जनजागृती करण्याचा प्रयत्न मंडळाच्या वतीने करण्यारक्तदानासोबत प्लेटलेट्स दानासाठी जनजागृती देखावा
त आला आहे. रक्ताचा कर्करोग, थेलेसेमिया, डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात प्लेटलेट्स आणि प्लाझमाची गरज असते.


हेही वाचा – इको फ्रेंडली वर्कशॉप – गणपती बाप्पा मोरया…

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -