घरCORONA UPDATE'यातही मोदींनी प्रमोशनची संधी सोडली नाही'; पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

‘यातही मोदींनी प्रमोशनची संधी सोडली नाही’; पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना पॅकेजमधून स्वतःची प्रसिद्धी केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केला आहे.

राज्यासह देशात सध्या कोरोनाचे संकट असून, दिवसेंदिवस रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. एवढेच नाही तर मुंबईमध्ये रोज वाढणारी आकडेवारी ही सध्या चिंतेची बाब बनली आहे. यातच आता या संकटामध्येदेखील राजकीय आरोप-प्रत्यारोपही होत असल्याचे पहायला मिळत आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना पॅकेजमधून स्वतःची प्रसिद्धी केल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केला आहे. मोदींनी कोरोना पॅकेजला स्वतःचे नाव देऊन स्वतःचे प्रमोशन केल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. एवढच नव्हे तर यातही मोदींनी प्रमोशनची संधी सोडली नाही, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी या आधी स्वातंत्र्योत्तर काळापासून सुरु असलेल्या पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीऐवजी (पीएम नॅशनल रिलिफ फंड) नवा पीएम केअर फंड सुरु करण्याच्या निर्णयावरही पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहेत.

हेही वाचा – अबब…बेस्टच्या बसेसमध्ये ‘सोशल डिस्टन्सिंग’चे वाजले तीन तेरा

- Advertisement -

नेमकं काय म्हणालेत पृथ्वीराज चव्हाण

जगातील कोणत्याही नेत्याने त्यांच्या देशात कोरोनासाठी प्रोत्साहन पॅकेजची घोषणा करताना त्याला राष्ट्रपतीचे पॅकेज किंवा पंतप्रधानांचे किंवा ट्रम्प यांचे पॅकेज असल्याचे म्हटले नाही. मात्र, भारतात कोरोनासाठीचे आर्थिक पॅकेज पीएम गरीब कल्याण पॅकेज असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले आहेत. तसेच “पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीची स्थापना जानेवारी १९४८ रोजी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी केली. त्यानंतर आजपर्यंत झालेल्या एकाही पंतप्रधानाला या निधीऐवजी नवा राष्ट्रीय निधी सुरु करण्याची गरज वाटली नाही. पण नरेंद्र मोदींनी पीएम केअर फंड सुरु करून स्वतःच्या प्रमोशनची संधी सोडली नाही, असा थेट हल्लाच पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -