डोंगरी दुर्घटना : मोदींनी व्यक्त केला शोक

डोंगरी दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला असून या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेले लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना देखील त्यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केली आहे.

Mumbai
Narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबईच्या डोंगरी भागात आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास केसरबाई इमारतीचा काही भाग कोसळून आतापर्यंत सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर अजूनही अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे बचावकार्य सुरु आहे. तर इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश जास्त असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेकांनी या दुर्घटनेनंतर सरकार विरोधात रोष व्यक्त केला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबाबत ट्विटरद्वारे शोक व्यक्त केला आहे.

काय म्हणाले मोदी

मुंबईतील डोंगरी येथे झालेली दुर्घटना अतिशय दुखद असून या दुर्घटनेत जीव गमावणाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी मी शोक व्यक्त करतो. तसेच या दुर्घटनेत जखमी झालेले लवकर बरे व्हावे अशी मा प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकार आणि एनडीआरएकडून बचावकार्य सुरु आहे.’

काय म्हणाले मुख्यमंत्री 

दुर्घटनाग्रस्त इमारत ही १०० वर्षे जुनी होती. परंतू तिचा धोकादायक इमारतीच्या यादीत तिचा समावेश नव्हता. पुनर्विकासासाठी इमारत विकासकाकडे दिली होती. सध्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. घडलेल्या घटनेची चौकशी होईलच पण सध्या अडकलेल्यांना बाहेर काढणं गरजेच आहे. एकूणच हा परिसर दाटीवाटीचा आहे. त्यामुळे बचावकार्यावर भर देणे आवश्यक आहे. गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली असून जखमींना तातडीने मदत करावी, अशा सुचना देण्यात आल्या आहेत. अद्याप मृतांबाबतची संपूर्ण माहिती मिळालेली नाही.


हेही वाचा – कोसळलेली इमारत म्हाडाची नव्हतीच! ट्रस्टदेखील तोंड फिरवणार?