घरताज्या घडामोडीमातोश्रीबाहेर आंदोलन करणाऱ्या पीएमसी खातेधारकांची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट

मातोश्रीबाहेर आंदोलन करणाऱ्या पीएमसी खातेधारकांची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट

Subscribe

पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेच्या खातेदारकांनी आज (रविवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीच्या बाहेर निदर्शन करत आरबीआय बँकेच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यासोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निदर्शन करणाऱ्या आंदोलकांना मातोश्रीत बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी खातेधारकांना धीर देत, “सरकार म्हणून जे जे सहकार्य करता येईल ते करेन असे आश्वासन दिले.”

आज दुपारी मुंबईतील पीएमसी बँकेचे खातेदारांनी अचानक मातोश्रीबाहेर आंदोलनाला सुरुवात केली होती. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्या प्रकारे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे, त्याप्रमाणे त्यांनी खातेदारांचे बुडालेले पैसेही मिळवून द्यावेत, अशी मागणी खातेदारांनी लावून धरली. यानंतर पोलिसांनी निदर्शन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -