घरमुंबईपॉकेटमनी सैनिक निधीसाठी

पॉकेटमनी सैनिक निधीसाठी

Subscribe

शहीद जवानांना विद्यार्थ्यांकडून अनोखी श्रद्धांजली

जम्मू काश्मीरच्या पुलवामा भागात दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा सर्वत्र निषेध होत असून, ठीकठिकाणी या हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. बदलापुरातील आदर्श महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही ‘आपल्या दहा दिवसांच्या खाऊचे पैसे सैनिक निधीसाठी देण्याचा’ संकल्प करून या शहीद जवानांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण केली आहे.

बदलापुरातील आदर्श महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शनिवारी महाविद्यालयाच्या प्रांगणात शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी महाविद्यलयातील विद्यार्थ्यांनी यापुढील दहा दिवस दररोज आपल्या खाऊचे पैसे सैनिक निधीमध्ये जमा करण्याचा संकल्प केला. अशीच मदत सर्वांकडून उपलब्ध झाल्यास शहिदांच्या कुटुंबीयांनाही मानसिक आधार मिळू शकेल. असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैदेही दप्तरदार यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करताना केले होते. या आवाहनाला उपस्थित सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद देऊन हा संकल्प केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -