घरमुंबईराजा ढाले यांना डोंबिवलीतील कवींनी वाहिली आदरांजली

राजा ढाले यांना डोंबिवलीतील कवींनी वाहिली आदरांजली

Subscribe

डोंबिवलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, जोतीराव फुले, शाहू महाराज यांच्या विचारांचे अनोखे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाथ दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले यांना कवींनी आदरांजली वाहिली.

महामानवांच्या विचारांचा आणि कार्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा, त्याविषयी नागरिकांना महत्व कळावे. तसेच त्यांच्या विचारांचा रथ पुढे नेण्यासाठी चैतन्य सुखदेव सोनावणे फाऊंडेशन ठाणे, बहुउद्देशीय मानवसेवा सामाजिक संस्था भिवंडी, कवी कट्टा गृप कल्याण-मुंबई, माझी आई प्रतिष्ठान सामाजिक संस्था भिवंडी, स.सु.स आणि लाख मोलाच्या कविता काव्यमंच कल्याण, विकास प्रबोधिनी संस्था भांडूप, मुंबई, रामवेणू काव्य मंच दिवा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महामानवांच्या विचारांचे कवी संमेलन’ डोंबिवलीच्या जोंधळे हायस्कूल येथे शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडले. कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी अॅड. प्रज्ञेश चैतन्य सोनावणे होते. तर संमेलनाचे उद्धाटन साहित्यिक जगदेव भटू, नवनाथ रणखांबे, विजयकुमार भोईर, सुरेखा गायकवाड, कवी दीप यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ साहित्यिक, विचारवंत राजाभाऊ ढाले यांना कवींच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली.

हेही वाचा – पँथरच्या महानायकाची जमा आणि शिल्लक!

- Advertisement -

‘डॉ. बाबासाहेब मानवमुक्तीच्या लढ्यातील प्रणेते’

छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले. बलुतेदार-अलुतेदार, अठरा पगड जातींना जोडून आणि सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले. हिंदू मुस्लिम, ब्राह्मणेतर वर्गाला सोबत घेऊन प्रत्येक सैनिकांना मावळा ही पदवी दिली. त्यामुळे महाराष्ट्र उभा राहिला. त्यांच्या विचारांना पुढे घेऊन जाणारे महात्मा जोतीराव फुलेंनी भारतातील जातीयव्यवस्थेला छेद देऊन समस्त स्त्रियांना शिक्षणाची द्वारे खुले केली आणि आज भारतीय महिला स्वाभिमानाने जगत आहे. फुले आणि आंबेडकरांना जोडणारा दुवा म्हणजे राजर्षी शाहू महाराज होय. स्वतःच्या राज्यात ५०% बहुजन समाजाला आरक्षणाची तरतूद करणारे खरे समाजसुधारक छत्रपती शाहू महाराज होय आणि आरक्षणाला संविधानिक दर्जा देऊन संपूर्ण बहुजन समाजाला एक प्रतिनिधित्व बहाल केले. देशात क्रांती घडवून आणणारे महामानव  डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. या महामानवांनी केलेला प्रचंड त्याग आणि त्यांच्या संघर्षाला जगात कुठेच तोड नाही. डॉ. बाबासाहेब मानवमुक्तीच्या लढ्यातील प्रणेते आहेत आणि त्यांच्या आदर्श घेऊन आज आम्ही सर्व जाती-जातींना जोडून महामानवांच्या विचारांना पुढे घेऊन जात आहोत. जातीयव्यवस्था नष्ट करण्यासाठी, सर्व जातींना जोडणे आवश्यक आहे असे कवी संमेलन अध्यक्ष अॅड. प्रज्ञेश सोनावणे यांनी बोलतांना सांगितले.

हेही वाचा – आंबेडकरी चळवळीची मोठी हानी

- Advertisement -

‘या’ कवींनी सादर केल्या कविता

नवनाथ रणखांबे, जगदेव भटू, विजयकुमार भोईर, मिलिंद जाधव, कवी दीप, अशोक कांबळे, विष्णु खांजोडे, सुरेखा गायकवाड, मनिषा मेश्राम, प्रतिभा सोनावणे, वृषाली माने, उदय क्षीरसागर, चेतन जाधव, संघरत्न घनघाव, ज्योती गोळे, गणेश गावखडकर, कामिनी धनगर, शंकर घोगरे या कवींनी महामानवांच्या विचारधारेवर आधारित, स्वरचित दर्जेदार कविता यावेळी सादर केल्या. सहभागी कवींना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे आभार कवी दीप यांनी केले. तर सूत्रसंचालन युवा कवी मिलिंद जाधव यांनी केले.

poets tribute to raja dhale through poems

हेही वाचा –संपादकीय : एक होता पँथर…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -