घरमुंबईफटाके विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई

फटाके विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई

Subscribe

हानिकारक फटाके जप्त करण्यास सुरुवात

सुप्रीम कोर्टाने ऑनलाईन फटाके विक्रीवर बंदी घालत कमी आवाज करणार्‍या फटाक्यांना विकण्याची मुभा विक्रेत्यांना दिली होती. त्यानुसार अनेक बाजारपेठांमध्ये फटाके विकले जात आहेत. पण पोलिसांनी या फटाके विकणार्‍या दुकानांवर तपासणी करत बेकायदेशीर जास्त आवाज करणारे फटाके जप्त करण्यास सुरुवात केली आहे. कुलाबा मार्केट परिसरात लावण्यात आलेल्या फटाके विक्रेत्यांच्या दुकानात पोलिसांनी तपासणी केली आणि दुकानात जास्त आवाज करणारे फटाके जप्त केलेले आहेत. मुंबई पोलिसांनी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई सुरु केल्याची माहिती मिळाली आहे.

न्यायालयाने रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके वाजवण्यास परवानगी दिल्यानंतर पोलिसांनीसुद्धा योग्य ती खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. दिवाळीसाठी रात्री ८ ते १० तसेच नवीन वर्ष आणि नाताळच्या वेळेला ११.४५ ते १२.३० या वेळेतेच फटाके वाजवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. ऑनलाईन आणि सरसकट फटाके विक्रीवर पोलिसांनी बंदी घातल्यानंतरही कमी आवाज करणारे फटाके बाजारात विकले जाऊ शकतात असा निर्णय दिला होता.

- Advertisement -

त्यानुसार पोलिसांनी बाजारात लावण्यात आलेल्या फटाक्यांची दुकानांची चाचणी करत फटाक्यांचे विविध प्रकार आणि त्यांची नावे यांची नोंद घेतली. यामध्ये मोठा आवाज करणार्‍या फटाक्यांवर जप्ती आणत पोलिसांनी कारवाई केलेली आहे. अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट यांसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांना फटाके विक्री करता येणार नाही,अशी अट कोर्टाने घातल्यांनतर बाजारातल्या दुकानांमध्ये फटाके विकत घेण्यासाठी मोठी गर्दी दिसत आहे त्यामुळे अशा प्रकारच्या कारवाईमुळे ध्वनीप्रदूषण होण्यास रोख लागणार आहे.

उशीरा सुचलेले शहाणपण
न्यायालयाने आदेश दिल्यानंतर बाजारात हे फटाके दाखल होण्यास सुरुवात झालेली होती. पण त्यावेळी पोलिसांनी कारवाई केली नसून आता बाजारात फटाक्यांची विक्री सुरु झाल्यानंतर पोलिसांनी दिवाळीच्या दुसर्‍या दिवशी कारवाई सुरु केल्याचा सूर फटाके विक्रेत्यांमधून व्यक्त होत आहे.

- Advertisement -

प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत आम्ही ही कारवाई करणार आहोत, त्यानुसार सुरुवातही केली आहे. जास्त आवाज करणार्‍या फटाक्यांची नोंद घेऊन ते फटाके आम्ही जप्त करत आहोत. तसेच प्रत्येक परिसरात आमचे लक्ष असणार आहे.
-प्रशांत गावडे,पोलीस उपनिरीक्षक, कुलाबा पोलीस ठाणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -