आता पोलिसांनाही हेल्मेटसक्ती अनिवार्य

सर्वसामान्यांप्रमाणे पोलिसांनाही हेल्मेटसक्ती अनिवार्य आहे. यासंबंधी मुंबई पोलीस वाहतूक विभागामार्फत मुंबईतील पोलीस ठाणे तसेच मुंबइ पोलिसांच्या सर्व विभागाला हेल्मेटसक्तीचे परिपत्रक जारी केरण्यात आले आहे.

Mumbai
police also have helmet compulsion
आता पोलिसांनाही हेल्मेटसक्ती अनिवार्य

मुंबईत हेल्मेटसक्ती सर्वासाठी असूनसुद्धा मुंबईत पोलीस दलातील काही अधिकारी तसेच कर्मचारी ही सक्ती मोडून सर्रासपणे विनाहेल्मेट दुचाकी चालवताना रस्त्यावर दिसत असतात. त्यामुळे विनाहेल्मेट दंड भरणाऱ्या दुचाकीस्वार आणि पोलिसांमध्ये अनेकवेळा वाद होत असतात. हेल्मेटवरून झालेल्या एका वादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये चांगलाच व्हायरल झाला होता. व्हायरल झालेल्या एका व्हिडियोने मुंबई पोलिसांची नाचक्की झाल्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांनी खुद्द याची दखल घेतली आहे. वाहतूक विभागामार्फत आयुक्तांनी मुंबई पोलिस दलाला एक परिपत्रक जारी करून पोलिसांना हेल्मेटसक्ती केली आहे. विनाहेल्मेट अथवा वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या पोलिसांना दंडात्मक कारवाई सोबत विभागीय कारवाईला देखील यापुढे सामोरे जावे लागणार असल्याचे सह पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आपलं महानगरशी बोलताना सांगितले, तसेच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्याना पाठीशी घालणाऱ्या वाहतूक पोलिसांना देखील विभागीय कारवाईला सामोरे जावे लागेल असेही त्यांनी म्हटले आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

वांद्रे पूर्व निर्मल नगर पोलीस ठाण्यातील एक पोलीस हवालदार गणवेशात असताना विनाहेल्मेट मोटारसायकल चालवत असताना काही तरुणांनी हवालदाराची मोटारसायकल अडवून विनाहेल्मेट मोटारसायकल चालवतात म्हणून जाब विचारत मोटरसायकलची चावी काढण्यात आली. तसेच मुंबई पोलिसांबद्दल अर्वाच भाषा वापरून या पोलीस हवालदाराला अपमानित केले गेले. या सर्व प्रकाराचा व्हिडीओ बनवून तो सोशल माध्यमावर व्हायरल करण्यात आला होता. या अपमानास्पद वागणुकीमुळे अखेर निर्मल नगर पोलीस ठाण्यात काही तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती, हा प्रकार गेल्या आठवड्यात घडला होता.

आयुक्तांनी जारी केले परिपत्रक

विनाहेल्मेट मोटारसायकल चालवताना पकडून आमच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते, मग हि हेल्मेटसक्ती सर्वांसाठी लागू असताना पोलीस विनाहेल्मेट मोटारसायकल का चालवतात? त्यांना कायद्याची भीती नाही का? असा प्रश्न या घटनेच्यावेळी अनेकांनी पोलिसांना विचारला होता. मात्र समाज माध्यमातून व्हायरल झालेल्या या व्हिडियोमुळे मुंबई पोलिसांची चांगलीच नाचक्की झाली होती. पोलिस कायदा मोडतात तेव्हा त्यांच्यावर कारवाई होत नाही, मात्र सामान्य व्यक्तीने कायदा मोडला त्यांच्यावर कारवाई होते. हा दुजाभाव पोलीस दलात असल्याची चर्चा या व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे रंगली होती. व्हायरल झालेल्या या व्हिडीओ मुंबई पोलीस आयुक्तांची दखल घेऊन वाहतुकीचे नियम हे सर्वांसाठी आहे, त्यात कोणीही असो असे सांगत आयुक्तांनी मुंबई पोलीस वाहतूक विभागामार्फत मुंबईतील पोलीस ठाणे व तसेच मुंबइ पोलिसांच्या सर्व विभागाला परिपत्रक जारी केले आहे.

काय म्हटले आहे परिपत्रकात?

मुंबई पोलीस ठाणे तसेच इतर शाखेतील अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कर्तव्यावर असताना मोटारसायकल चालवत असताना हेल्मेट वापरत नाही असे वारंवार निर्दशनात आले असल्याचे, तसेच दिलेल्या सुचनाचे पालन करीत नाही. यापुढे मोटारसायकल चालवताना पोलीस दलातील सर्वानी हेल्मट परिधान करण्याची आदेश ८ फेब्रुवारी रोजी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

वाहतूक विभागाकडून परिमंडळ, शाखा,आणि पोलीस ठाणे याना पोलिसांसाठी हेल्मेटसक्तीचे परिपत्रक जरी करण्यात आलेले आहे. यापुढे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या तसेच विनाहेल्मेट मोटारसायकल चालवताना कुठल्याही विभागातील पोलीस अधिकारी अथवा अंमलदार पकडला गेल्यास त्याच्यावर दण्डात्मक कारवाई तर होईलच पण त्याच्यावर विभागीय कारवाई देखील करण्यात येईल, तसेच वाहतुकीचे कायदे मोडणाऱ्या कुठल्याही पोलिसांना कारवाई न करता सोडून देताना वाहतूक पोलीस आढळून आल्यावर त्याच्यावरदेखील विभागीय कारवाई करण्यात येईल.
– अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त (वाहतूक)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here