घरमुंबईहिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी आणखी एकाला अटक

हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी आणखी एकाला अटक

Subscribe

हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी आणखी एका अधिकाऱ्याला अटक केली आहे. या आधी क्चरल ऑडिटर नीरजकुमार देसाई याला अटक केली होती.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी मुंबई पोलिसांनी मुंबई पालिकेतील सहाय्यक अभियंता एस.एफ.काकुळते यांना अटक केली आहे. या आधी मुंबई पोलिसांनी या प्रकरणी नीरजकुमार देसाई यांना अटक केली होती. या प्रकरणी आणखी काही अधिकाऱ्यांना अटक होऊ शकते.

१४ मार्चला झाली होती दुर्घटना

- Advertisement -

१४ मार्चला संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान सीएसएमटी जवळचा हिमालय पूल कोसळला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला तर ३१ जण गंभीर जखमी झाले. या प्रकरणी आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. या पुलाचे ऑडिट करणाऱ्या डी.डी. देसाई असोसिएटेड इंजिनियरिंग कन्सल्टन्ट आणि अनालिस्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर ठपका ठेवण्यात आला. या दुर्घटनेप्रकरणी चुकीचा स्ट्रक्चरल अहवाल दिल्याचा ठपका असलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटर नीरजकुमार देसाई याला अटक केली. सदोष मनुष्यवधाप्रकरणी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. सीएसएमटी पूल दुर्घटनाप्रकरणी मुख्य अभियंता एस. ओ. कोरी, ए. आर. पाटील, उपमुख्य अभियंता आर. बी. तारे आणि सहाय्यक अभियंता एसएफ काकुळते यांचे निलंबन करण्यात आले आहे. दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी रेल्वे आणि महापालिका अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पालिकेच्या अहवालानुसार सोमवारी रात्री सहायक अभियंता एस. एफ. काकुळते यांना अटक करण्यात आली. काकूळते यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -