घरमुंबईठाण्यात सरकारची दडपशाही; मनसेचा आरोप

ठाण्यात सरकारची दडपशाही; मनसेचा आरोप

Subscribe

ठाण्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी विविध भागातून मनसेच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड करीत त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे सरकारची दडपशाही सुरु असल्याचा आरोप मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

कोहिनूर मिलप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गुरूवारी ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहिले. त्यानंतर ठाणे जिल्ह्यातही त्याचे तीव्र पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. मात्र, राज यांनी कार्यकत्यांना शांत राहण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर मनसेने पुकारलेला बंद मागे घेतला होता. मात्र, ठाण्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी विविध भागातून मनसेच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड करीत त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे सरकारची दडपशाही सुरु असल्याचा आरोप मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

ईडीने राज ठाकरे यांना नोटीस बजावल्यानंतर मनसे कार्यकत्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले होते सुरूवातीला मनसेने ठाण्यासह कल्याण डोंबिवलीत बंद करण्याचा इशारा दिला होता. मात्र, राज यांनी नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी बंद मागे घेण्याचे आवाहन केल्यानंतर बंद मागे घेण्यात आला होता. गुरूवारी सकाळी राज हे चौकशीसाठी ईडी कार्यालयात पोहचल्यानंतर पोलिसांनी मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकत्यांना ताब्यात घेतले ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे आणि मनसेच्या समिक्षा मार्कंडे ठाणे उपशहर अध्यक्ष पुष्कराज विचारे, प्रभाग क्रमांक ६ प्रभाग अध्यक्ष निलेश चौधरी शिवाईनगर शाखा महेश चव्हाण, उपशाखा अध्यक्ष प्रशांत हिंगे ,महाराष्ट्र सैनिक सावनकुमार माने, मनसे वाहतूक ठाणे जिल्हाध्यक्ष आशिष डोके, ठाणे शहर सचिव रविंद्र सोनार , प्रभाग क्र. २२ चे अध्यक्ष विनायक रणपिसे, ठाणे जिल्हा विद्यार्थी सेना सचिव सचिन सरोदे , मनसेचे प्रशांत पालांडे आदींना पोलिंसांनी ताब्यात घेतले. तसेच उल्हासनगरमधील लालचौकी परिसरात मनसेचे जिल्हा अध्यक्ष सचिन कदम, शहर अध्यक्ष बंडू देशमुख आदी कार्यकर्ते भाजप सरकार विरोधात निषेध करीत असतानाच टिटवाळा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अटक केली.

- Advertisement -

राज ठाकरे म्हणजे मराठी माणसाची अस्मिता‘ : आमदार आव्हाड

ठाण्यातील मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांची पोलीस ठाण्यात जाऊन भेट घेतली. ‘राज ठाकरे यांना ईडीने चौकशीसाठी बोलवल्याने लोकांमध्ये अस्वस्थता आहे. ही अस्वस्थता फक्त मनसे कार्यकर्त्यांमध्ये नाही तर संपूर्ण समाजामध्ये आहे. कारण ठाकरे म्हटलं की मराठी माणसाची अस्मिता हे त्यांचे विरोधकही मान्य करतील. सुडाचे राजकारण या देशातील सहन करत नाही, असे म्हणत आव्हाड यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

तर मनसे शांत बसणार नाही : अविनाश जाधव

मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सरकारने दडपशाही सुरू केली त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागणार आहे. राज साहेबांनी शांत राहण्याचे आवाहन केल्याने आजचा दिवस शांततेच्या मार्गाने गेला. मात्र, त्यांच्याबाबतीत कोणताही अनुचित प्रकार घडला तर मनसे शांत बसणार नाही, असा इशारा जाधव यांनी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिला. तर ही सरकारची अघोषित आणिबाणी असून मनसे कार्यकर्ते शांत बसणार नाही, असेही मनसे विभाग अध्यक्ष महेश कदम म्हणाले. पोलिसांनी केलेल्या धरपकडीमुळे मनसैनिक संतप्त झाले होते.

- Advertisement -

हेही वाचा – ‘ईडी, सीबीआयच्या माध्यमातून वैचारिक शत्रूंना उद्ध्वस्त करण्याचा डाव’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -