महिलेची बदनामी करणारे दोन सुरक्षा रक्षक गजाआड

सुरक्षा रक्षकाने महिलेला व्हाट्सअॅपवर अश्लील मॅसेज पाठवले होते. याप्रकरणी महिलेने मुंबईच्या चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Mumbai
woman arrested by bandra police
पतीसह प्रेयसीला अटक

महिलेला व्हाट्सअॅपवर अश्लील संदेश पाठवल्या प्रकरणी पोलिसांनी दोन सुरक्षारक्षकांना बेड्या ठोकल्या आहेत. वाहिद अहमद नजीर हुसेन चौधरी आणि मोहम्मद तारिक मोहम्म्द फारुक चौधरी अशी या सुरक्षा रक्षकाची नाव आहेत. चितळसर पोलीस ठाण्यात महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी या दोन सुरक्षारक्षकांना अटक केली आहे.

हेही वाचा – मोदींवर केमिकल हल्ल्याची धमकी; सुरक्षा रक्षकाला अटक

काय आहे प्रकार?

मुंबईतील चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गृहसंकुलात अलर्ट सेक्युरिटी एजन्सीचे सुरक्षा रक्षक कार्यरत होते. यापैकी वाहिद अहमद नजीर हुसेन चौधरी हा गृहसंकुलातील रहिवाशांकडून पैसे घेऊन त्यांची खाजगी कामे करत असे. याबाबत गृहसंकुलातील रहिवासी महिलेने एजन्सीच्या संचालकांकडे तक्रार केली. त्यावरून संचालकांनी वाहिद याला कामावरून काढून टाकले. याचाच राग मनात धरून वाहिद याने महिलेच्या व्हाट्स अॅपवर अश्लील संदेश पाठवले. तसेच महिलेच्या फोटोसह आपला फोटो लावून तो व्हाट्सअॅपवर प्रसारित केला.

हेही वाचा – डोंबिवलीमध्ये सुरक्षारक्षकाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली

गृहसंकुलाच्या मॅनेजरने सुरक्षा रक्षक मोहम्मद तारिक मोहम्म्द फारुक चौधरी याचा मोबाईल फोन करण्यासाठी घेतला असता त्यावर त्याचा गृहसंकुलातील महिलेसोबतचा फोटो आढळला. याबाबतची माहिती महिलेला मिळताच त्यांनी चितळसर पोलीस ठाण्यात सुरक्षा रक्षकाविरोधात तक्रार नोंदवली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी वाहिद चौधरी आणि मोहम्मद तारिक चौधरी या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पुढील तपास चालू असल्याची माहिती चितळसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांनी दिली आहे.


हेही वाचा – बिहारमध्ये महिलांची सुरक्षा आता तृतीयपंथींच्या हातात

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here