घरमुंबईन्यूड कॉल करणारा भामटा गजाआड

न्यूड कॉल करणारा भामटा गजाआड

Subscribe

महाराष्ट्रातील ६५८ महिलांचा फेसबुकवरुन छळ

मोबाईल आणि इंटरनेटच्या क्रांतीने जग एकमेकांशी जोडले गेले आहे. याचा फार मोठा फायदा झाला असला तरी प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. त्याप्रमाणे मोबाईल, इंटरनेटच्या फायद्या सोबत वााईट देखील परिणाम होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. ज्ञान आणि माहितीचे स्त्रोत खुले करणाऱ्या माध्यमांचा महिलांना छळ करण्यासाठी वापर केला जात असल्याचे उघड झाले आहे. सोशल नेटवर्किंग साईट म्हणून ओळख्या जाणाऱ्या फेसबुकचा वापर करुन महाराष्ट्रातील तब्बल ६५८ महिलांचा छळ केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडल्याचे समोर आले. विश्वजीत जोशी (२६) असे या आरोपीचे नाव असून नाशिक सायबर गुन्हे शाखेने याला अटक केली आहे.

- Advertisement -

पुण्यातील १५ मुलींचा छळ

नाशिक येथे राहणारा विश्वजीत मुलींच्या नावाने बनावट अकाऊंट तयार करुन महिलांशी बोलायचा. या तरुणाने आतापर्यंत वेगवेगळया महिलांच्या नावाने २० बनावट अकाऊंट उघडली असल्याचे समोर आले आहे. विश्वजीत आधी सभ्य गृहस्थाप्रमाणे समोरच्या व्यक्तीशी बोलायचा पण नंतर अचानक तो अश्लील चॅटिंग सुरु करायचा. त्याचबरोबर हा तरुण स्वत: नेकेड होऊन फेसबुकवरुन महिलांना व्हिडिओ कॉल करायचा व चेहरा लपवून ठेवायचा. पुण्यातील २० ते ३५ वयोगटातील जवळपास १५ मुलींना त्याने अशाप्रकारे त्रास दिल्याचे उघडकीस आले.

- Advertisement -

बनावट अकाऊंटवरुन अश्लील व्हिडिओ

पुण्यातील एका तरुणीला या तरुणाने अश्लील व्हिडिओ कॉल केला होता. समोरचे दृश्य पाहून या तरुणीला धक्काच बसला. समोर विवस्त्र अवस्थेत असलेला अज्ञात तरुण तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. तरुणीने दिलेल्या माहितीनुसार १५ मे पासून सोनल शितोळे या बनावट अकाऊंटवरुन अश्लील मेसेज आणि फोटो येत होते. जेव्हा त्या तरुणीने अकाऊंट ब्लॉक केले तेव्हा दोन दिवसांसाठी तिचा त्रास थांबला. पण त्यानंतर पुन्हा सोनल जामल या अकाऊंटवरुन तिला अश्लील फोटो आणि मेसेज येण्यास सुरुवात झाली. अखेर पीडित तरुणीने नाशिक सायबर गुन्हेशाखेकडे तक्रार दाखल करताच विश्वजीत जोशी ते अकाऊंट वापरत असल्याचे समोर आले.

महाराष्ट्रातील ६५८ महिलांचा छळ

विश्वजीतने आता पर्यंत महाराष्ट्रातील तब्बल ६५८ महिलांचा फेसबुकवरुन छळ केल्याचे समोर आले आहे. या तरुणाने वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या ठिकाणातील मुलींना अश्शील मेसेज करायचा. विश्वजीतने कॉम्प्युटर अॅप्लिकेशनमध्ये पदवी घेतली असून त्याचे वडिल सेवानिवृत्त, मोठा भाऊ इंजिनियर तर आई गृहिणी आहे. पोलिसांनी त्याच्याकडून एक लॅपटॉप, एक मोबाइल फोन आणि सीम कार्ड जप्त केले असून पोलिसांनी विविध कलमांखाली त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -