घरCORONA UPDATEहोमिओपॅथिक गोळ्यांच्या मदतीने पोलिसांची रोगप्रतिकार शक्ती वाढवणार

होमिओपॅथिक गोळ्यांच्या मदतीने पोलिसांची रोगप्रतिकार शक्ती वाढवणार

Subscribe

मुंबईसह महाराष्ट्रातील पोलिसांमधील कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन पोलिसांसाठी १ लाख ७० हजार आर्सेनिक आल्बम ३० या होमिओपॅथी औषधांच्या गोळ्यांच्या वाटपाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम गृह विभागाने आखला आहे.

राज्यात कोरोना संकटाच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता पोलीस बांधव आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र कर्तव्य बजावणाऱ्या  पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यातच काही पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळेच मुंबईसह महाराष्ट्रातील पोलिसांमधील कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन पोलिसांसाठी १ लाख ७० हजार आर्सेनिक आल्बम ३० या होमिओपॅथी औषधांच्या गोळ्यांच्या वाटपाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम गृह विभागाने आखला आहे.

लॉकडाऊनच्या काळात पोलीस दलावरील कामाचा ताण प्रचंड वाढला आहे. अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे तर काही पोलिसांचा दुर्देवाने मृत्यु झाला आहे. त्यामुळे पोलिसांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी केंद्रीय पोलीस दल मागवण्याबरोबरच पोलिसांची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम गृह विभागाच्यामार्फत सुरु झाला आहे. आयुष मंत्रालय व केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सुचनेनुसार महाराष्ट्रातील पोलिसांना आर्सेनिक आल्बम ३० या गोळ्यांचे वाटप करण्यासाठी पोलिस महासंचालक कार्यालय व पोलीस सर्जन डॉ. एम. एम. पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. सध्याच्या घडीला सुमारे एक लाख गोळ्यांचे मोफत वाटप झाले आहे. यामध्ये पोलीस रुग्णालयातील मानद डॉक्टर या पदावर कार्यरत असलेले डॉ. राहुल जोशी व डॉ. रवी हे होमिओपॅथिक कंपन्या व काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने या १ लाख ७० हजार गोळ्यांचे विनामूल्य वाटप करीत आहेत. या गोळ्यांचा बॉक्स त्यांनी पोलीस महासंचालक (प्रशासकीय) कृष्णप्रकाश यांच्याकडे सुपुर्द केला.

- Advertisement -

या संदर्भात अधिक माहिती देताना डॉ. राहुल जोशी म्हणाले की, महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस स्टेशनमधील अधिकारी व पोलिसांना या गोळ्यांचे वाटप होत आहे. कारण या गोळ्यांमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते हे निर्विवाद सत्य आहे. त्यावर संशोधनही झालेले आहे. या गोळ्यांमध्ये शरिरात अँटीबाँडीज निर्माण होतात. त्यामुळे कोरोनाची लागण होत नाही. एका कंपनीच्या मदतीने अँप तयार केले आहे. गोळ्या घेतल्यावर पोलिसांनी त्यांची माहिती या अँपवर नोंदवायची आहे. आतापर्यंत एक हजार पोलिसांनी अँपवर त्यांची माहिती नोंदवली आहे. पोलीस महासंचालक कार्यालयामार्फत अँपवरील माहिती गोळा करण्याचे काम सुरु आहे. या गोळ्यांमुळे पोलिसांना नक्कीच फायदा होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -