प्रतिष्ठित नागरिकांच्या सन्मानाने पोलिसांकडून साजरी दिवाळी

Mumbai
दिवाळी साजरी करताना पोलीस

पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रतिष्ठीत नागरिकांसोबत दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन करून ठाणे नगर पोलीस कर्मचार्‍यांनी दिवाळीच्या आनंदात सर्वांना सहभागी करून घेतले. तसेच पोलीस ठाण्यातील महिलांना भाऊबीज भेट म्हणून साड्या देण्यात आल्या. याप्रसंगी पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ठाणे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ज्येष्ठ नागरिक, महिला समिती सदस्य, कौमी एकता समिती, पोलीस मित्र, मोहल्ला कमिटी आदी समित्यांच्या सदस्यांना या दिवाळी फराळ कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले होते. या वेळी विविध संस्थांमधील सुमारे 100 ते 150 जण उपस्थित होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय साबळे, पोलीस निरीक्षक (प्रशासन) सुरेश आव्हाड यांनी यावेळी सदर मान्यवरांच्या सोबत फराळ केला.

ज्येष्ठ नागरिक हे अंधारातील काठीसारखे असून त्यांच्या जोरावरच आमची पिढी काम करु शकते. म्हणून त्यांचा सन्मान करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यांची काळजी घेणे हे आपले परम कर्तव्य आहे. महिला समिती सदस्य, कौमी एकता समिती, पोलीस मित्र, मोहल्ला कमिटीच्या सदस्यांमुळेच पोलीस यंत्रणेला आधार मिळत आहे. आज जी काही शांतता आहे, त्याचे श्रेय याच समिती सदस्यांना जात आहे
– रविकांत मालेकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, ठाणे

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here