घरमुंबईपीएमसी बँक घोटाळा 'या' व्यक्तीला माहित होता, पण...

पीएमसी बँक घोटाळा ‘या’ व्यक्तीला माहित होता, पण…

Subscribe

पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळ्याची माहिती हा घोटाळा जगासमोर येण्याअगोदरच एकाला ठाऊक होती. विशेष म्हणजे या व्यक्तीने बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापनाला याबाबत माहिती दिली होती. याशिवाय एचडीआयएल कंपनीच्या बनावट खात्याबाबत रिझर्व्ह बँकेला माहिती देण्याची विनंती देखील त्याने केली होती. त्याचबरोबर ही माहिती रिझर्व्ह बँकेला दिली नाही, तर आपण आत्महत्या करु, असा देखील इशारा त्याने वरिष्ठ व्यवस्थापनाला दिला होता. ही व्यक्ती बँकेतील एक जागरुक कर्मचारी होती. मात्र, वरिष्ठ व्यस्थापनाने त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे हा घोटाळा मैदानात आला. ही संपूर्ण माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी सादर होणाऱ्या आरोपपत्रात आज पहिल्यांदाच अशा कर्मचाऱ्याचा उल्लेख केला गेला. हे आरोपपत्र तब्बल ३२ हजार पानांचे आहे. हे आरोपपत्र तीन महिन्यांच्या तपासानंतर तयार करण्यात आले आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण?

पीएमसी बँकेने २००८ ते ऑगस्ट २०१९ या कालावधीत एचडीआयएल कंपनीला कोट्यवधी रुपयांचे कर्ज वाटप केले होते. भांडुपच्या पीएमसी बँकेतून या कर्जाचे वाटप केल्यानंतर या कंपनीसह त्यांच्या सलग्न कंपनीचे कर्जाची परतफेड झाली नव्हती. या बँकेतील ठराविक कंपन्यांची मोठी कर्ज खाती परतफेड होत नसल्याने अनुत्पादक कर्ज (एनपीए) झाली होती. असे असतानाही त्यांना अनुत्पादक कर्ज घोषित करण्यात आले नव्हते. तसेच ही माहिती जाणीवपूर्वक रिझर्व्ह बँकेपासून लपविण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणात बँकेला ४ हजार ३५५ कोटी ४६ लाख रुपयांचे नुकसान झाले होते. या गैरव्यवहार संबंधित कंपनीने बँकेच्या अधिकार्‍यांना हाताशी धरुन केला होता, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेत फसवणुकीसह अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. याप्रकरणी राकेश वाधवा, सारंग वाधवा, माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस. बँकेचे माजी अध्यक्ष वरियम सिंग, माजी संचालक सुरजीत सिंग यांना आरोपी बनवण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -