घरमुंबईदहा हजार रुपयांची लाच घेताना पोलीस निरीक्षकाला अटक

दहा हजार रुपयांची लाच घेताना पोलीस निरीक्षकाला अटक

Subscribe

धारावी पोलीस ठाण्याच्या तीन पोलीस कर्मचार्‍यांसह चौघांविरुद्ध लाच घेतल्याप्रकरणी कारवाई झाली असतानाच सोमवारी वडाळा टी. टी. पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जबरदस्त जाधव यांना दहा हजार रुपयांची लाचेची रक्कम घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. एका पोलीस निरीक्षकालाच लाच घेतल्याप्रकरणी अटक झाल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती.

यातील तक्रारदार हा वडाळा टी टी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अभिलेखावरील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध 14 जानेवारीला पोलीस ठाण्यात एका गुन्ह्यांची नोंद झाली होती. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला जामिनावर सोडून देण्यात आले होते. जामिनावर बाहेर येताच त्याच्याविरुद्ध तडीपार आणि एमपीडीएची प्रतिबंधात्मक कारवाईची प्रकिया सुरु झाली होती. ही कारवाई न करण्यासाठी त्याच्याकडे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी सत्तर हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ही लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती.

- Advertisement -

या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर चंद्रकांत जाधव यांनी त्याच्याकडे लाचेची मागणी केल्याचे उघडकीस आले होते. रविवारी त्यांनी त्याला फोन करुन पैशांबाबत विचारणा केली होती. यावेळी त्याने केवळ दहा हजार रुपयांची व्यवस्था झाल्याचे सांगून ही रक्कम देण्यासाठी पोलीस ठाण्यात येतो असे सांगितले होते. त्यानंतर सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या पोलीस ठाण्याजवळ साध्या वेशात सापळा लावला होता. पोलीस ठाण्याच्या समोरील दुकानाजवळ तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाचेची रक्कम घेताना चंद्रकांत जाधव यांना या अधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडले. ही माहिती मिळताच पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली होती. चंद्रकांत जाधव हे काही महिन्यांनंतर सेवानिवृत्त होणार होते, निवृत्तीपूर्वीच त्यांना लाचप्रकरणी अटक झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -