घरमुंबईप्रचारात जनतेच्या मुलभूत प्रश्नांकडे उमेदवारांकडून डोळेझाक

प्रचारात जनतेच्या मुलभूत प्रश्नांकडे उमेदवारांकडून डोळेझाक

Subscribe

ठाणेकरांच्या मूळ प्रश्नांकडे प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार आणि त्यांचे पाठीराखे चर्चा करताना दिसत नाहीत, अशी खंत सर्वसामान्य ठाणेकर व्यक्त करीत आहेत.

ठाणे लोकसभा मतदार संघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे आणि शिवसेना भाजप युतीचे राजन विचारे यांच्यामध्येच थेट लढत होणार आहे. सध्यातरी दोन्ही उमेदवार आणि त्यांचे पाठीराखे दुपारची उन्हे टाळून सकाळ-संध्याकाळ नागरिकांना भेटून आपली भूमिका पटवून देत आहेत. मात्र, पाणी पुरवठा, आरोग्य व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्था आदी जनतेच्या मुलभूत प्रश्नांकडे उमेदवारांनी सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

डिजीटल व्हॅनद्वारे प्रचार

ठाणे महानगर पालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या नंदलाल समितीचे प्रकरण बाहेर काढून युतीच्या उमेदवारावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने केला आहे. तसेच शिक्षणाचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. विद्यामान खासदारांनी संसदेमध्ये किती प्रश्न मांडले, किती प्रकल्प कार्यान्वीत केले, याचा हिशोब राष्ट्रवादी प्रचारा दरम्यान मागू लागली आहे. दुसरीकडे या प्रश्नांना थेट उत्तर देण्याचे टाळून शिवसैनिक थेट मतदारांशी संपर्क साधत आहेत. डिजीटल व्हॅनद्वारे केलेली कामे आणि मोदी सरकारच्या जाहिरातींचे प्रसारण केले जात आहे. भाजपला मानणारा जैन आणि मारवाडी समाज ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्याशी थेट संपर्क साधण्याकडे राजन विचारे यांनी लक्ष केंद्रीत केले आहे.

- Advertisement -

मूळ प्रश्नांकडे डोळेझाक

रस्ता रुंदीकरण, अनधिकृत बांधकामे, नको तिथे पूल, बिल्डरांपुढे सुविधांच्या पायघड्या, विकासाच्या आड येणाऱ्या शहरातील वृक्षांची कत्तल, जुने-नवे ठाणे थीम पार्क घोटाळा, त्यात त्या तलावांचे पुन्हा पुन्हा सुशोभिकरण, कचऱ्याचे गैरव्यवस्थापन, कंत्राटी कामगारांचे शोषण, शहरातील ढासळलेली आरोग्य व्यवस्था, फसलेली क्लस्टर योजना आदींविषयी प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार आणि त्यांचे पाठीराखे चर्चा करताना दिसत नाहीत, अशी खंत सर्वसामान्य ठाणेकर व्यक्त करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -