सर्वांनी मतदान करा; मुख्यमंत्र्यांचं आवाहन

Mumbai
maharashtra assembly election 2019 more than 60 thousand employees trained for election procedure

निवडणूक आयोगाने लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. सर्वांनी मतदान करावे असे आवाहन मी करतो. लोकशाहीमध्ये लोक सरकारकडे प्रश्न विचारतात आणि त्यांना शासनाकडून अपेक्षा असतात. पण, मतदान करणाऱ्यांनाच त्याचा नैतिक अधिकार आहे. असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येकाला मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.

भाजपा महायुतीचं पुन्हा सरकार येणार – विनोद तावडे

विधानसभा निवडणुकीची तारीख आता जाहीर झाली आहे. येत्या २१ ऑक्टोबर २०१९ ला विधानसभेसाठी महाराष्ट्र आणि हरियाणासाठी मतदान होणार आहे. तसंच, २४ ऑक्टोबरला निकाल जाहीर करण्यात येतील. त्यामुळे, येत्या दिवाळीपूर्वी नवं सरकार स्थापन होणार आहे. या निर्णयानंतर भाजप नेते विनोद तावडे यांनी भाजपा महायुतीचं पुन्हा सरकार येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

विनोद तावडे म्हणाले की, चांगल्या कामाला शाबासकी देणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. भाजपा महायुतीचं पुन्हा सरकार येणार आहे. पुढच्या ५ वर्षात काय काम करणार हे लोकांना पटवून देऊ. महाराष्ट्रात भाजपा सरकार येत्या काही दिवसांमध्ये आपण काय केलं आणि आम्ही काय करणार आहोत हे ८.९४ कोटी लोकांपर्यंत पोहोचणार आहे. विरोधक आता बिथरले आहेत. विरोधक शस्त्र टाकून बसले आहेत. आम्ही २२० पारचे लक्ष्य ठेऊन आहोत. हा आकडा पुढे जाईल. निवडणूक ही निवडणूक असते. जनतेसाठी भरभरुन काम करायचंय. यासाठी जनतेचे आशीर्वाद महत्त्वाचे आहेत.

तसंच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुन्हा सरकार स्थापन करु असा विश्वासही विनोद तावडे यांनी व्यक्त केला.

नितेश राणे म्हणतात माझा कार्यकाळ आज संपला

आमदार म्हणून माझा कार्यकाळ आज संपला. माझ्या जनतेचे मी आभार मानतो की मला त्यांची सेवा करण्याची संधी दिली. माझ्या जनतेच्या ज्या ज्या अपेक्षा होत्या त्या मी या ५ वर्षात पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मला मदत आणि मार्गदर्शन करणाऱ्या माझ्या सगळ्याच सहकाऱ्यांचे आभार! अशा आशयाचं ट्विट आमदार नितेश राणे यांनी विधानसभा निवडणुकीबाबत केलं आहे.

“निवडणूक आयोगाने मतदानासाठी जी तारीख जाहीर केली आहे त्याचं मी स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने जे चांगलं काम केलंय त्याचा फायदा जनतेला झाला आहे. त्या कामांना धन्यवाद देण्यासाठी ही निवडणूक होणार आहे.”- मंगलप्रभात लोढा, मुंबई अध्यक्ष भाजप