घरमुंबईठाण्यात वॉटरप्रुफ मतदानकेंद्रावर होणार मतदान

ठाण्यात वॉटरप्रुफ मतदानकेंद्रावर होणार मतदान

Subscribe

ठाणे जिल्ह्यात ६ हजार ६२१ मतदार केंद्र असून त्यापैकी ७९६ मतदानकेंद्र वॉटरप्रुफ मंडपामध्ये बांधण्यात येणार

पावसाळ्याचे दिवस संपले असले तरी परतीच्या पावसाचा धुमाकूळ मात्र सुरूच आहे. पावसाचे चार महिने संपल्यानंतरदेखील हा पाऊस असाच पडत आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार हा परतीचा पाऊस ऑक्टोबर महिन्यातही कोसळणार असून दिवाळी पर्यंत राहण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुका याच काळात असल्याने मतदानावर पावसाचे संकट कायम असण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच परतीच्या पावसापासून बचाव व्हावा याकरिता ठाणे जिल्ह्यात ६ हजार ६२१ मतदार केंद्र असून त्यापैकी ७९६ मतदानकेंद्र वॉटरप्रुफ मंडपामध्ये असणार आहेत.


मुंबईसह राज्यात १ कोटींहून अधिक तरुण मतदार

मतदानावर पावसाचे संकट

जिल्हा प्रशासनासमोर असलेल्या अव्हानानुसार संपुर्ण ठाणे जिल्ह्यातील ६ हजार ६२१ मतदान केंद्र असून त्यापैकी १०० टक्के मतदान केंद्र तळमजल्यावर आणायचे होते. त्यापैकी १७००हून अधिक मतदान केंद्र हे तळमजल्यावर आणण्यात आले आहे. मात्र प्रशासनावर ७९६ केंद्र खुल्या मैदानामध्ये उभारावे लागले आहे. परंतु, परतीच्या पावसाचा फटका या तळमजल्यावर उभारण्यात आलेल्या मतदानकेंद्रांना बसू नये म्हणून जिल्हा प्रशासनाकडून सर्व मंडप वॉटरप्रुफ बनवण्यास भर देण्यात आला आहे.

- Advertisement -

असे आहेत वॉटरप्रुफ मंडप असलेले मतदानकेंद्र

जिल्हा प्रशासनाकडून उभारण्यात येणाऱ्या मंडपात पत्रे आणि ताडपत्री यांचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे जोरदार जरी पाऊस पडला तरी या मतदानकेंद्रावरील मंडपात पावसाच्या पाण्याचा त्रास होणार नाही. यंदाच्या या निवडणुकीला अशा प्रकारच्या मंडपांची संख्या वाढली असून आवश्यक सुविधांनी उपयुक्त अशा वॉटरप्रुफ मंडपांच्या उभारणीला प्रयत्न केला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

मतदारांची गैरसोय टळणार

जिल्हा प्रशासनाकडून उभारण्यात येणाऱ्या वॉटरप्रुफ मंडपांमध्ये विद्युत पुरवठा, पिण्याच्या पाणी, स्वच्छतागृह अशा सोयी-सुविधा असल्याने मतदारांची गैरसोय होणार नाही. पावसाच्या दृष्टीने वॉटरप्रुफ मंडप उभारणी करण्यात आली आहे. तसेच मशिनवर सूर्यकिरणांमुळे तांत्रिक बिघाड होणार नाही याचीही काळजी यावेळी घेतली जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -