घरमुंबईभिवंडीत ईव्हीएम यंत्र ठेवलेल्या स्ट्राँगरूमबाहेर केले होमहवन

भिवंडीत ईव्हीएम यंत्र ठेवलेल्या स्ट्राँगरूमबाहेर केले होमहवन

Subscribe

मतदान झाल्यानंतर ईव्हीएम यंत्र ज्या ठिकाणी ठेवण्यात आले आहे, त्या स्ट्राँगरूम बाहेरच होमहवन करण्याचा प्रकार घडला आहे.

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे चार टप्प्यातील मतदान संपल्यानंतर मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम येथील सुरक्षा बाबत काँग्रेस पक्षाकडून निरनिराळे आक्षेप घेतले जात असतानाच भिवंडी लोकसभा मतदार संघातील मतमोजणी ज्या ठिकाणी होत आहे त्या भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावरील एलकुंदे येथील प्रेसिडेन्सी शाळेच्या बाहेर बाजूस एका इनोव्हा कारमध्ये काही जण होमहवन करीत असल्याचे आढळून आले. काँग्रेस कार्यकर्त्यांना याची कुणकुण लागताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत त्या कार मालकांना अडवीत त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मतदान २९ एप्रिल रोजी पार पडल्या नंतर सहाही विधानसभा क्षेत्रातील मतदान ईव्हीएम यंत्र सोनाळे ग्रामपंचायत हद्दीतील एलकुंदे येथील प्रेसिडेन्सी स्कुल या ठिकाणी बनविण्यात आलेल्या स्ट्रॉंगरूम मध्ये ठेवण्यात आल्या असून त्या ठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस , राज्य राखीव पोलीस, स्थानिक पोलीस असा तीन स्तरावरील जागता पहारा ठेवण्यात आला असून तेथील सीसीटीव्ही वर नजर ठेवण्यासाठी काँग्रेस उमेदवारांनी सुध्दा आपले कार्यकर्ते पहारेकरी म्हणून बसविले आहेत . परंतु याच शाळेच्या गेट मध्ये असलेल्या दुसया इमारती मध्ये शाळा व्यवस्थापनाचे कार्यालय असून त्या ठिकाणी जाण्यास कोणासही मज्जाव नसल्याने त्या ठिकाणी कोणीही जाऊ शकतो. तेथील शाळेचे चेअरमन महावीर जैन यांना भेटण्यासाठी आलेले श्रीकांत पंदिरे व त्यांचे दोन साथीदार गेट मधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी गेट पासून काही अंतरावर असलेल्या आपल्या इनोव्हा कार ( क्रमांक MH 04 EF 2315) मध्ये होमहवनास सुरवात केली.

- Advertisement -

याची माहिती काँग्रेस कार्यकर्त्यांकडून स्थानिक युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विजय पाटील यांना समजताच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेत त्यांच्या कार अडविली. कारची तपासणी केली असता कारच्या मागील बाजूस होमहवन सामुग्री आढळून आल्याने तेथील पोलिसांना बोलावून गोंधळ घालण्यास सुरवात केली. त्यावर सदर कारमालक श्रीकांत पंदिरे यांनी आपण गोदाम खरेदी च्या चर्चेसाठी महावीर जैन यांच्याकडे आलो असता माघारी जाताना सूर्यास्ताची झाल्याने कार मध्येच होमहवन केले त्यामागे कोणताही दुसरा हेतू नसल्याचे सांगत विनवणी केली असता त्यांना सोडून देण्यात आले .

सदरच्या ठिकाणी स्ट्रॉंग रूम असताना त्या आवारातील संपूर्ण परिसर निवडणूक यंत्रणेने ताब्यात घेतला असताना शाळेच्या इमारतीसाठी वेगळा न्याय का असा सवाल उपस्थित करीत, ज्यांना हरण्याची भीती असते तेच अशा प्रकाराने होमहवन जादूटोणा यांचा संहार घेतात असे सांगत पोलिसांनी सुध्दा या बाबत संपूर्ण परिसर लक्ष ठेवणे गरजेचे असून शाळेच्या कार्यालयात बसून आपले व्यावसायिक व्यवहार करण्याया इमारतीमध्ये सुध्दा कोणालाही जाण्यास पायबंद घातला पाहिजे अशी मागणी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विजय पाटील यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -